शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

परिवर्तन केले तरच कुकडीचे पाणी

By admin | Updated: June 2, 2014 00:37 IST

श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीत जनता चुकीचा कौल देते आणि पुन्हा आम्हाला पाणी नाही, वीज नाही, रस्ते खराब म्हणून टाहो!

श्रीगोंदा : विधानसभा निवडणुकीत जनता चुकीचा कौल देते आणि पुन्हा आम्हाला पाणी नाही, वीज नाही, रस्ते खराब म्हणून टाहो! अगोदर आमदार बदला तर कुकडीचे पाणी शेतकर्‍यांच्या शेतात येईल, असे प्रतिपादन माजी आमदार शिवाजीराव नागवडे यांनी बेलवंडी येथे बोलताना केले. जि.प.चे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या सोहळ्यात शिवाजीराव नागवडे बोलत होते. अध्यक्षस्थानी पोपट माने होते. नागवडे पुढे म्हणाले की, अण्णासाहेब शेलार यांनी कर्तृत्व आणि विश्वासाच्या बळावर राजकारणात झेप घेतली आहे. भविष्यात सर्वांचा एकत्रीत निर्णय घेऊन राजकारण, समाजकारणात काम करावे लागणार आहे. कुकडीचे अध्यक्ष राहुल जगताप म्हणाले की, अण्णासाहेब शेलार मन जिंकणारा नेता आहे, असून त्यांची लोकप्रियतेची वेगळी खुबी आहे. बाळासाहेब नाहाटा म्हणाले की, राष्टÑवादीचे नेते कुकडीच्या पाणी प्रश्नावर जखमेवरचे मीठ चोळण्याचे काम करीत आहे. राजकारणात चुकीचे निर्णय घेतल्याचा हा परिणाम आहे.राजेंद्र नागवडे म्हणाले, कुकडीच्या पाण्यासाठी घेतलेल्या बैठका फार्स आहे. शेतकर्‍यांचे जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी चाललेला हा पोरखेळ आहे. कैलासराव पाचपुते म्हणाले, कोणत्या तरी एकाच दगडाला शेंदूर लावा म्हणजे कार्यकर्त्यांना कामाला लागता येईल. अण्णासाहेब शेलार म्हणाले की, मी वाढदिवस साजरा करावा एवढा मोठा माणूस नाही, परंतु कार्यकर्त्यांनी कार्यक्रम आयोजित केला. आगामी निवडणुकीत एकास एक उमेदवार दिला तर सत्ता परिवर्तन अटळ आहे. परंतु नेत्यांना डोके ठिकाणावर ठेवून निर्णय घ्यावा लागेल. यावेळी डी.एम.भालेराव, सरस्वती डाके, विष्णू जठार, मच्छिंद्र नलगे, मनेष जगताप, सुभाष काळाणे, मनोज इथापे, अशोक काळाणे, सुधीर काळाणे, रमन मुनोत यांची शुभेच्छापर भाषणे झाली. पिंपळगाव पिसा येथे आर.जे. ग्रुप ने रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिराचे उद्घाटन कुंडलिकराव जगताप यांच्या हस्ते झाले.यावेळी बापुशेठ गोरे, मनोहर पोटे, महेंद्र वाखारे, मिलिंद दरेकर, जिजाबापू रोडे, सुदाम पवार, एम.डी. शिंदे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)