शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
3
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
4
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
5
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
6
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
7
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
8
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
9
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
10
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
11
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
12
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
13
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
14
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
15
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
16
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
17
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
18
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
19
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
20
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
Daily Top 2Weekly Top 5

शिर्डी विमानतळावरून काकडी ग्रामस्थ संतप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 15:50 IST

शिर्डी विमानतळास जागा दिलेल्या काकडी ग्रामस्थांनाच विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रवेश नाकारून अपमानास्पद वागणूक दिल्याने काकडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे याबाबत पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी १२ आॅक्टोबरला ग्रामसभाच बोलाविण्यात आली आहे.

ठळक मुद्देउद्घाटनप्रसंगी प्रवेश नाकारून अपमानास्पद वागणूक१२ आॅक्टोबरला विशेष ग्रामसभा

उद्घाटनाला डावलले : १२ आॅक्टोबरला विशेष ग्रामसभाअस्तगाव : शिर्डी विमानतळास जागा दिलेल्या काकडी ग्रामस्थांनाच विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी प्रवेश नाकारून अपमानास्पद वागणूक दिल्याने काकडी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. त्यामुळे याबाबत पुढील रूपरेषा ठरविण्यासाठी १२ आॅक्टोबरला ग्रामसभाच बोलाविण्यात आली आहे.२ आॅक्टोबरची विशेष ग्रामसभा कोरमअभावी तहकूब करून ४ आॅक्टोबरला ही सभा ठेवण्यात आली होती. पण ४ तारखेस फक्त औपचारिक चर्चा करून १२ आॅक्टोबरला सकाळी ९ वाजता विशेष ग्रामसभा भरविण्याचा निर्णय घेण्यात आला.काकडी गावातील ग्रामस्थांनी जमीन देऊन एवढे मोठे योगदान दिले असतानाही उद्घाटनस्थळी ग्रामस्थांनाच प्रवेश नाकारण्यात आला. उलट त्यावेळी ग्रामस्थांना घराबाहेर पडण्यास पोलिसांनी प्रतिबंध केला. या अपमानास्पद वागणुकीमुळे काकडी ग्रामस्थ संतापले आहेत. याशिवाय काकडी गावातील अनेक प्रकल्पग्रस्तांना सरकारने शब्द दिल्याप्रमाणे अजून नोकºया दिलेल्या नाहीत. जमिनीचा योग्य मोबदला नाही. तसेच सध्या विमानतळावर काकडी ग्रामस्थांना येऊ दिले जात नसल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे. जमीन अधिग्रहणाचे काम सुरू असताना सरकारकडून गावासाठी अनेक आश्वासने देण्यात आली. पण त्याची पूर्तता झाली नाही. या बाबींच्या पाठपुराव्यासाठी एक समिती गठीत करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. विमानतळात ज्या ज्या ग्रामस्थांना नोकरी दिली आहे, त्यांना विमानतळ प्राधिकरण केव्हाही काढू शकते. त्यामुळे जे तेथे नोकरीस लागले आहेत, त्यांनीसुद्धा ग्रामसभेला यावे असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.तेराशे एकर शेतजमीन विमानतळास दिलीगाव एकत्र नसल्याचा फायदा विमानतळ प्राधिकरणाने घेतला आहे. प्राधिकरण काकडी ग्रामस्थांना जर विमानतळावर येऊ देत नसेल तर त्यांनासुद्धा आमच्या ग्रामपंचायत हद्दीतून जाण्याचा अधिकार नाही. काकडी गावातील जवळपास १३०० एकर शेतजमीन विमानतळात गेलेली आहे. पण सरकारला आमच्या योगदानाची जाणीव नाही. त्यामुळे आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.