मगर यांचा निर्णय विनाशकाले विपरीत बुद्धी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:19 IST2020-12-24T04:19:18+5:302020-12-24T04:19:18+5:30

नागवडे म्हणाले की, केशव मगर यांना शिवाजीराव नागवडेंनी राजकारणात आणले. सत्तेची दोरी हाती दिली. परंतु, मगर यांचे मित्रांनी कान ...

Crocodile's decision is destructive | मगर यांचा निर्णय विनाशकाले विपरीत बुद्धी

मगर यांचा निर्णय विनाशकाले विपरीत बुद्धी

नागवडे म्हणाले की, केशव मगर यांना शिवाजीराव नागवडेंनी राजकारणात आणले. सत्तेची दोरी हाती दिली. परंतु, मगर यांचे मित्रांनी कान फुंकले आणि त्यांच्या अंगात वारे शिरले आहे.

सहवीजनिर्मिती प्रकल्पाबाबत मगर यांनी आरोप केले की, कारखान्याची ८० लाखांची अनामत रक्कम जप्त होणार. पर्यावरण विभागाची मान्यता नसल्याने ७० लाखांचा दंड होणार, पण या विरोधात आमची कायदेशीर लढाई सुरू असून ही रक्कम वाचविणार आहोत. दिशाभूल करणारी माहिती त्यांनी सांगितली, पण वीजनिर्मिती प्रकल्प उभा करताना ३५ कोटी वाचविले, हे ते का सांगत नाहीत. कारखान्याचे सर्व निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत होतात. खरेदी-विक्रीचे निर्णय तर मगर यांना विचारुन झाले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेला आरोप खोटा आहे.

शासनाने शिक्षक भरतीस बंदी घातली आहे. त्यामुळे कोणती भरती झाली? राज्यातील पाॅलिटेक्निकची वाईट अवस्था आहे. यामध्ये इंदिरा गांधी पाॅलिटेक्निकची परिस्थिती चांगली आहे.

सर्व संचालक मंडळ सोबत आहेत, पण मगर हे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून बाहेर पडले आहेत, हे सर्वांना ज्ञात आहे. जनता अशा विश्वासघातकी विचारांना थारा देणार नाही. आण्णासाहेब शेलार व दीपक भोसले यांनी केलेल्या आरोपाबाबत विचारले असता यांच्याविषयी बोलण्याची गरज नाही. ते उद्या बरोबर असतील, असेही नागवडे म्हणाले.

------

फोटो - राजेंद्र नागवडे

Web Title: Crocodile's decision is destructive