शासकीय कार्यालयात कोविड चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:26 IST2021-08-21T04:26:07+5:302021-08-21T04:26:07+5:30
.... दरेवाडीतील मोफत आरोग्य शिबिर अहमदनगर : दरेवाडी जिल्हा परिषद गटात बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले व के.के. ...

शासकीय कार्यालयात कोविड चाचणी
....
दरेवाडीतील मोफत आरोग्य शिबिर
अहमदनगर : दरेवाडी जिल्हा परिषद गटात बाजार समितीचे माजी सभापती हरिभाऊ कर्डिले व के.के. आय बुधराणी रुग्णालय, यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत मोतीबिंदू व शस्त्रक्रिया शिबिर घेण्यात आले. यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले, बाजार समितीचे सभापती अभिलाष घिगे, खरेदी- विक्री संघाचे सभापती सुरेश सुंबे, उपसभापती संतोष म्हस्के, बाबासाहेब खर्से, बबन आव्हाड, बाळासाहेब निमसे, संदीप कर्डिले. फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे आदी उपस्थित होते.
....
कोविशिल्डचे दोन हजार डोस
अहमदनगर : महापालिकेच्या सातही आरोग्य केंद्रात कोविशिल्डचे प्रत्येकी २५० डोस शनिवारी उपलब्ध होणार आहेत. यापैकी दुसरा डोस घेणाऱ्यांना दीडशे, तर पहिला डोस घेणाऱ्यांसाठी १०० डोस दिले जाणार आहेत. पहिला डोस सकाळी नऊ वाजेपासून उपलब्ध राहणार असतील, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.