शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
2
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
3
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
4
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
5
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
6
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
7
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
8
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
9
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
10
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
11
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
12
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
13
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
14
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
15
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
16
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
17
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
18
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
19
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
20
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लॉकडाऊनमुळे बहुरूपी समाजावर उपासमारीची वेळ, सरकारी मदतीची प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2021 08:20 IST

Coronavirus: कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन तसेच बंद करण्यात आलेले आठवडी बाजार यामुळे बहुरूपींच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.

- योगेश गुंडकेडगाव (नगर) - ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता गावोगावी भ्रमंती करून सोंग घेऊन लोकांचे मनोरंजन करणाऱ्या बहुरूपी समाजावर कोरोनामुळे उपासमारीची वेळ आली आहे. दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे त्यांना पालातच बसून रहावे लागत असून, त्यांना सरकारी मदतीची प्रतीक्षा आहे.जेऊर येथे नेवासा तालुक्यातील सोनई परिसरातून १३ कुटुंबे उपजीविकेसाठी वास्तव्यास आली आहेत. पाल टाकून हे कुटुंब गेल्या अनेक दिवसांपासून वास्तव्य करत आहेत. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेला लॉकडाऊन तसेच बंद करण्यात आलेले आठवडी बाजार यामुळे बहुरूपींच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये याच कुटुंबीयांना जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख, तहसीलदार याचबरोबर अनेक सेवाभावी संस्था, दानशूर व्यक्तींनी अन्नधान्य व किराण्याची मोठी मदत केली होती. परंतु, यंदा मात्र त्यांना मदतीची अद्याप प्रतीक्षा आहे. या कुटुंबीयांना ग्रामपंचायत कार्यालयाकडून किराणा व इतर मदत करण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास अधिकारी सविता लांडे तसेच सरपंच राजश्री मगर यांनी दिली आहे. 

नकला केल्यानंतर लोकांकडून अन्नधान्य तसेच काही पैसे मिळतात. त्यावर कुटुंबाची उपजीविका चालते. परंतु, लॉकडाऊनमुळे जीवनाची घडी विस्कटली आहे. प्रशासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.-सुनील शिंदे, बहुरूपी कलाकार, जेऊर 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसAhmednagarअहमदनगर