शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

विविध कार्यकारी सोसायटींच्या निवडणुकीवर कोरोनाचे सावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:32 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील ४९ विविध कार्यकारी सोसायटींच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने ...

अहमदनगर : जिल्ह्यातील ४९ विविध कार्यकारी सोसायटींच्या निवडणुकीची प्रक्रिया सोमवारी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने गर्दी रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. सोसायटींच्या निवडणुकीमुळे गर्दी होणार असल्याने या निवडणुकीवर कोरोनाचे सावट असल्याचे सांगितले जाते.

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर गत मार्च महिन्यांत लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या गेल्या. लॉकडाऊन शिथिल झाल्याने निवडणुकांची स्थगिती सहकार खात्याकडून उठविण्यात आली. जिल्ह्यातील ४९ विविध कार्यकारी सोसायटींच्या निवडणूक प्रक्रिया मतदार यादी अंतिम करण्याच्या टप्प्यावर थांबविण्यात आली होती. शासनाने स्थगिती उठविल्याने येथील उपजिल्हा निबंधक कार्यालयाकडून निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार सोमवार उमेदवारी दाखल करण्यासह सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातीन नगर, नेवासा, शेवगाव, श्रीगोंदा, पाथर्डी, संगमनेर, राहाता, राहुरी, जामखेड, पारनेर तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायटींच्या निवडणुका होत असून, त्यासाठी मार्च अखेरीस मतदान घेण्यात येणार आहे. याशिवाय सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मतदारांच्या याद्या जाहीर करण्यात येत असून, या निवडणुकांवरही कोरोनाचे सावट आहे.

....

सोसायटींच्या निवडणुका

नगर- ३, संगमनेर-८, राहाता-५, राहुरी-३, नेवासा-३, शेवगाव-७, श्रीगोंदा-१४ ,पारनेर-५