शहरं
Join us  
Trending Stories
1
शपथविधी सुवेंदू अधिकारींचा, पण PM मोदी-DCM शिंदे भेटीची चर्चा; काय बोलले? सगळा तपशील समोर
2
“पुढील २० वर्षे भाजपा पंजाबमध्ये पाय रोवू शकणार नाही”; अरविंद केजरीवाल यांची PM मोदींवर टीका
3
होर्मुझ सामुद्रधुनीत युद्धाचा भडका! नाकेबंदी फोडण्याचा प्रयत्न फसला; अमेरिकेचा इराणच्या दोन तेलवाहू जहाजांवर हल्ला
4
PAK vs BAN : गडबड घोटाळा! पाकिस्तानच्या संघात भारतीयांचा भरणा; रोहित शर्माचं नाव कॅप्टनच्या रुपात झळकलं
5
जालन्यात मनसे आक्रमक! ॲड. गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर ओतली शाई, सुपाऱ्या फेकल्या
6
IPL 2026: सूर्यकुमार खेळणार की नाही? हार्दिकच्या फिटनेसचं काय? MIचा कॅप्टन कोण? पाहा अपडेट
7
“RG कर प्रकरणातील पीडितेला न्याय मिळेल”; सुवेंदू अधिकारी यांच्या आईने व्यक्त केली अपेक्षा
8
IPL 2026 : MI प्रमाणेच CSK चीही डाळ शिजणार नाही! दिग्गजाची प्लेऑफ्सबाबत मोठी भविष्यवाणी
9
कुस्तीपटू विनेश फोगाटला मोठा धक्का! तब्बल १८ महिन्यांनी करणार होती कुस्तीत पुनरागमन, पण...
10
"आरोप म्हणजे शिक्षा नव्हे!" निदा खान प्रकरणात असदुद्दीन ओवेसींची एंट्री, विरोधकांना सुनावले
11
Thalapathy Vijay: 'थलपती विजय'साठी मैदान मोकळं? 'व्हीसीके'कडून 'टीव्हीके'ला बिनशर्त पाठिंब्याची घोषणा!
12
'महाभारत' मालिकेत रूपा गांगुली यांनी नेसली होती २५० मीटर लांबीची साडी, या कंपनीनं केली होती तयार; किती होती किंमत? 
13
आपच्या पंजाबमधील मंत्र्याला ईडीकडून अटक, घरावर टाकलेल्या धाडीनंतर केली कारवाई   
14
सुवेंदू अधिकारी यांच्या शपथविधीनंतर अभिषेक बॅनर्जी यांची प्रदीर्घ पोस्ट; लोकशाहीचा दाखला दिला
15
आधी कथित गर्लफ्रेंडची हमाली, मग रात्री उशिरा डिनर पार्टी; अर्शदीप-समरीन जोडीचा नवा VIDEO व्हायरल
16
नाशिकच्या TCS प्रकरणावरून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा भाजपाचा डाव, काँग्रेसचा आरोप  
17
‘युझवेंद्र चहलला तुरुंगात पाठवले पाहिजे…’, भारताचा माजी क्रिकेटपटू संतापला, कारण  काय?  
18
शपथविधीनंतर सुवेंदू अधिकारी अभिवादन करण्यासाठी येताच योगींनी केलं असं काही, दिली खास भेट  
19
२ शत्रू ग्रहांचा शुभ राजयोग २०२६: ९ राशींना अकल्पनीय लाभ, पदोन्नती-उत्पन्न वाढ; करारात नफा!
20
क्रिकेटपटू युवराज सिंगसोबत व्हायरल झालेल्या Video मधील अभिनेत्री नव्या नायर कोण आहे? पाहा PHOTOS
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे सरकारच्या ५० कोटी वृक्षलागवडीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST

अण्णा नवथर लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनामुळे राज्य सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेला ब्रेक लागला आहे. पाऊस मुबलक असूनही वृक्षलागवड ...

अण्णा नवथर

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : कोरोनामुळे राज्य सरकारच्या वृक्षलागवड मोहिमेला ब्रेक लागला आहे. पाऊस मुबलक असूनही वृक्षलागवड झालेली नाही. सरकारकडूनही यंत्रणांना कार्यक्रम दिला गेला नाही. त्यामुळे जिल्हास्तरावरील प्रशासकीय यंत्रणांनीही वृक्षलागवडीचा कार्यक्रम घेतला नसून, सलग दुसऱ्या वर्षीही ही मोहीम ठप्प आहे. दरम्यान, वनविभागाने ३४५ हेक्टर क्षेत्रावर तीन लाख ६० हजार वृक्षलागवड करण्याचे नियोजन केले आहे.

कोरोनाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला. शासनाला विविध कार्यक्रम रद्द करावे लागले. महाविकास आघाडी सरकारने पाच वर्षांत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट ठेवले होते. त्यासाठी राज्य सरकारने क्रांतिवीर वसंतराव नाईक हरित अभियान ही योजना सुरू केली होती. प्रत्येक वर्षांत दहा कोटी वृक्षलागवड करण्याचा सरकारचा मानस होता. परंतु, कोरोनाच्या संकटामुळे हा कार्यक्रम बारगळला. सरकारकडून दोन वर्षांत याबाबत कोणत्याही सूचना केल्या गेल्या नाही. दरवर्षी सरकारकडून जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, ग्रामपंचायती, महसूल, सार्वजनिक बांधकाम, सामाज कल्याण आदी विभागांना वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट दिले जाते. जिल्हास्तरावर यंत्रणांना रोपे देणे, त्याचा हिशोब ठेवणे, रोपे तयार करणे, यंत्रणांमध्ये समन्वय ठेवण्याची जबाबदारी वनविभागावर असते. परंतु, मागीलवर्षी लॉकडाऊन होता. त्यामुळे वृक्षलागवड कार्यक्रम सरकारकडून जाहीर झाला नाही. लॉकडाऊन असल्याने इतर यंत्रणांनीही वृक्षलागवड केली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील विविध रोपवाटिकांमध्ये पाच लाख १८ हजार रोपे शिल्लक राहिली आहेत. ही रोपे आता २ ते ३ फुटापर्यंत वाढली आहेत. ही रोपे यंदा वनक्षेत्रामध्ये लावण्याचे नियोजन वनविभागाने केले आहे.

...असा असतो वृक्षलागवड कार्यक्रम

- जानेवारी ते ३१ मार्च खड्डे खोदणे

- मार्च ते जून रोपवाटिकेत रोपे तयार करणे

- १ जुलै ते ३० सप्टेंबर वृक्षलागवड

- प्रत्येक कार्यालयाने वृक्षलागवडीसाठी ५ टक्के निधी खर्च करणे बंधनकारक

- ऑक्टोबरपासून वृक्षलागवडीचे संवर्धन करणे

- दर तीन महिन्यांनी जिवंत वृक्षांचा अहवाल देणे

.......

अशी झाली वृक्षलागवड

सन २०१८-१९- १ कोटी १८ लाख

सन २०१७-१८- ५५ लाख

सन- २०१६- १७- २८ लाख

.....

वनविभागाची वृक्षलागवड मोहीम सुरूच

राज्य सरकारकडून वृक्षलागवड कार्यक्रम जाहीर झाला नसला तरी वनविभागाकडून दरवर्षी लागवड केली जाते. मागील वर्षील लॉकडाऊन असूनही वनविभागाने १५० हेक्टर क्षेत्रात एक लाख ५५ हजार वृक्षांची लागवड केली. यंदा ३४५ हेक्टर क्षेत्रावर तीन लाख ६० हजार वृक्षलागवड करण्याचे वनविभागाने नियोजन केले आहे.