नारायणडोहो येथे कोरोना तपासणी शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:19 IST2021-04-25T04:19:53+5:302021-04-25T04:19:53+5:30

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील नारायणडोहो या ठिकाणी काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले होते. येथे प्रवीण ...

Corona inspection camp at Narayandoho | नारायणडोहो येथे कोरोना तपासणी शिबिर

नारायणडोहो येथे कोरोना तपासणी शिबिर

चिचोंडी पाटील : नगर तालुक्यातील नारायणडोहो या ठिकाणी काही दिवसात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून आले होते. येथे प्रवीण कोकाटे यांच्या नियोजनातून कोविड रॅपिड टेस्ट कॅम्प घेण्यात आला. या ठिकाणी एकूण ५१ रुग्णांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमध्ये ८ जण कोरोना बाधित आढळून आली व ४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. हा कॅम्प यशस्वी होण्यासाठी कोकाटे, सरपंच सविता किशोर गायकवाड, उपसरपंच पोपट बनकर, डाॅ. दातीर, ग्रा. पं. सदस्य पोपट साठे, अवि साठे, प्रकाश म्हस्के, रेवननाथ शिंदे, ज्ञानेश्वर साठे, बंडू मुंढे, रायपिल्ले, ग्रामसेवक भोंढवे, तलाठी वाबळे, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व पं. सं. चे आरोग्य कर्मचारी यांनी प्रयत्न केले. रुग्णांना पुढील उपचारासाठी चिचोंडी पाटील येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

Web Title: Corona inspection camp at Narayandoho