शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यपालांचा पुन्हा ब्रेक?
2
भारताचा दणका अन् चीनचा खोटारडेपणा! १ वर्षानंतर चीनने जगासमोर मान्य केलं ऑपरेशन सिंदूरमधील 'ते' सत्य
3
पुन्हा उधारीच्या भरवशावर पाकिस्तान! IMF कडून १.३२ बिलियन डॉलर्सची मदत; पण जनतेचे कंबरडे मोडणार?
4
लेफ्टिनेंट जनरल एन. एस. राजा सुब्रमणी देशाचे नवे CDS, अशी आहे त्यांची कारकीर्द 
5
Dividend Stock: एका शेअरवर ७५ रुपयांचा डिविडंड देतेय 'ही' दिग्गज कंपनी, रेकॉर्ड डेट निश्चित, ब्रोकरेजनं वाढवलं टार्गेट
6
लग्नानंतर २६ वर्षांनी आर. माधवनने सांगितली पुरुषांची 'मन की बात'! पत्नीकडून असतात 'या' अपेक्षा
7
तक्रारींकडे दुर्लक्ष केल्यास ५० लाख दंड! ट्रायचे कठोर पाऊल; नवीन नियमावलीचा मसुदा जाहीर
8
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
9
Petrol Diesel Rate: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार का? सरकारच्या एका निर्णयाचा कंपन्यांना मोठा फटका; महिन्याला होतंय ₹३०००० कोटींचं नुकसान
10
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
11
बऱ्याच दिवसांनी दिसला परश्या, पुण्यातील इव्हेंटमध्ये रिंकू-आकाशची हजेरी; नंतर दोघांची धमालमस्ती
12
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
13
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
14
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
15
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
16
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
17
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
18
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
19
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
20
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीविना जवळ्यातील विहिरीचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST

जवळे : येथील सिद्धेश्वर ओढ्यामध्ये महादेव मंदिरातलगत सहा महिन्यांपूर्वी खोदकाम करून बांधकाम करण्यात आलेल्या विहिरीसाठी कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली ...

जवळे : येथील सिद्धेश्वर ओढ्यामध्ये महादेव मंदिरातलगत सहा महिन्यांपूर्वी खोदकाम करून बांधकाम करण्यात आलेल्या विहिरीसाठी कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नाही. त्यासाठी निविदाही काढलेली नाही. यामध्ये जनतेपेक्षा स्वतःचे हित पाहिल्याचे लक्षात येते, असा आरोप जवळे (ता. पारनेर) येथील ग्रामस्थ भाऊसाहेब प्रकाश आढाव यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ग्रामपंचायतीने खोदलेल्या विहिरीपासूनच पन्नास-साठ फुटांवर गावातील सांडपाणी जात आहे. त्यामुळे आज नाही तरी भविष्यात त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. हा विचार ग्रामपंचायतीने यापूर्वीच करायला हवा होता. त्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य नसल्याचा शासकीय अहवालही प्राप्त झालेला आहे. १५ सप्टेंबरपासून विहिरीजवळच बेमुदत उपोषण करणार असल्याचे भाऊसाहेब आढाव यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

---

आता अचानक तक्रार का?

अनेक वर्षांपासून उन्हाळ्याचे चार ते पाच महिने गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असते. याबाबत ग्रामसेभत अनेकदा विषय झाला. या विहिरीबाबत मासिक सभेत कल्पना दिली होती. त्यानंतरच विहिरीचे काम केलेले आहे. त्यामुळे हे काम एकाच रात्रीत झालेले नसून जवळपास दोन महिने काम सुरू होते. त्या काळात एकाही ग्रामस्थाने या कामाबाबत तक्रार केली नाही. आता मात्र अचानक काय झाले माहीत नाही. त्यामुळे भाऊसाहेब आढाव यांच्या मागणीला योग्य ते उत्तर देऊ, सरपंच अनिता सुभाष आढाव यांनी सांगितले.