शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

परवानगीविना जवळ्यातील विहिरीचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:25 IST

जवळे : येथील सिद्धेश्वर ओढ्यामध्ये महादेव मंदिरालगत सहा महिन्यांपूर्वी खोदकाम करून बांधकाम करण्यात आलेल्या विहिरीसाठी कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली ...

जवळे : येथील सिद्धेश्वर ओढ्यामध्ये महादेव मंदिरालगत सहा महिन्यांपूर्वी खोदकाम करून बांधकाम करण्यात आलेल्या विहिरीसाठी कोणतीही शासकीय परवानगी घेतलेली नाही. त्यासाठी निविदाही काढलेली नाही. यामध्ये जनतेपेक्षा स्वतःचे हित पाहिल्याचे लक्षात येते, असा आरोप जवळे (ता. पारनेर) येथील ग्रामस्थ भाऊसाहेब प्रकाश आढाव यांनी केला आहे. त्यामुळे संबंधित कामाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. ग्रामपंचायतीने खोदलेल्या विहिरीपासूनच पन्नास-साठ फुटांवर गावातील सांडपाणी जात आहे. त्यामुळे आज नाही तरी भविष्यात त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. हा विचार ग्रामपंचायतीने यापूर्वीच करायला हवा होता. त्यामुळे ते पाणी पिण्यास योग्य नसल्याचा शासकीय अहवालही प्राप्त झालेला आहे. १५ सप्टेंबरपासून विहिरीजवळच बेमुदत उपोषण करणार असल्याचे भाऊसाहेब आढाव यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

---

आता अचानक तक्रार का?

अनेक वर्षांपासून उन्हाळ्याचे चार ते पाच महिने गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासत असते. याबाबत ग्रामसभेत अनेकदा विषय झाला. या विहिरीबाबत मासिक सभेत कल्पना दिली होती. त्यानंतरच विहिरीचे काम केलेले आहे. त्यामुळे हे काम एकाच रात्रीत झालेले नसून जवळपास दोन महिने काम सुरू होते. त्या काळात एकाही ग्रामस्थाने या कामाबाबत तक्रार केली नाही. आता मात्र अचानक काय झाले माहीत नाही. त्यामुळे भाऊसाहेब आढाव यांच्या मागणीला योग्य ते उत्तर देऊ, असे सरपंच अनिता सुभाष आढाव यांनी सांगितले.