शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

जलविद्युत प्रकल्प पूर्णत्वाकडे

By admin | Updated: May 22, 2014 00:01 IST

राजूर : निळवंडे धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या सात मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून

राजूर : निळवंडे धरणाच्या पायथ्याशी उभारण्यात आलेल्या सात मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून, हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर प्रवरेच्या पाण्यावर सुरू होणारा हा तिसरा जलविद्युत प्रकल्प ठरणार आहे. प्रवरेच्या पाण्यावर भंडारदरा येथे सुरुवातीला बारा मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प शासनामार्फत उभारण्यात आला. यानंतर याच पाण्यावर कोदणी येथे ३४ मेगावॅट क्षमतेचा दुसरा जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आला. मात्र कोदणीचा प्रकल्प सुरू राहण्यासाठी त्यास २ हजार ७०० क्युसेकचा पाण्याचा विसर्ग आवश्यक असल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांतच हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू असतो. तर इतर वेळी भंडारदरा धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यानंतर हे पाणी रंधा येथील उन्नयनी बंधार्‍यात साठविले जाते त्यानंतर ते वीज निर्मितीसाठी सोडण्यात येत असते. भंडारदरा- १ प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू राहिल्यास वर्षाला सुमारे साडेतीन हजार कोटी युनिट, तर कोदणीतून साडेपाच हजार कोटी युनिट वीजनिर्मिती होऊ शकते. हे दोन्ही प्रकल्प करार पद्धतीने खासगीरित्या चालविण्यास दिले आहेत. भंडारदरा धरणातून सोडण्यात येणारे पाणी पुढे निळवंडे धरणात साठविण्यात येते व त्यानंतर ते प्रवरा पात्रात सोडण्यात येते. या पाण्यावरच पुन्हा वीजनिर्मिती करण्याचे ठरवत शासनाने हा प्रकल्प बीओटी तत्त्वावर उभारण्यास परवानगी दिली व काही महिन्यांत हा प्रकल्पही उभा राहिला. वीज निर्मितीसाठी ३.५ मेगावॅट क्षमतेचे दोन टर्बाईन उभारण्यात आले असून, विजेचे पॅनल बोर्डही बसविण्यात आले आहेत. यात तयार होणारी वीज भोजदरी येथील १३२ केव्ही उपकेंद्रास जोडण्यात येणार होती, मात्र हे उपकेंद्र अद्याप उभे राहिले नसल्याने सध्या ही वीज राजूर वीज उपकेंद्रास जोडण्यात येणार आहे. यासाठी प्रकल्प ठिकाणापासून राजूरपर्यंत १९ मनोरे उभारण्यात येत आहेत. हे कामही युद्धपातळीवर सुरू आहे. प्रकल्पासाठी धरणातून पाणी सोडण्यासाठी केवळ गेट बसविण्याचे काम बाकी आहे. हे काम एक दीड महिन्यात पूर्ण होणार असल्याचा अंदाज द्वार-उभारणी पथकाचे सहाय्यक अभियंता पी. एन. थोरात यांनी व्यक्त केला. (वार्ताहर) ५३ मेगावॅटची क्षमता हा प्रकल्प पावसाळ्यात सुरू झाल्यास भंडारदरा धरणाच्या प्रवरेतील पाण्यावर एकूण ५३ मेगावॅट वीज निर्मिती सुरू होईल आणि पावसाळा व धरणातील अन्य आवर्तन काळात या तीनही प्रकल्पांतून वर्षभरात सुमारे दहा हजार कोटी युनिटहून अधिक वीजनिर्मिती होईल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर कॅनालच्या गेटशीही तीन मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.