श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:23 IST2021-09-21T04:23:07+5:302021-09-21T04:23:07+5:30
शहरातील महत्त्वाच्या नॉदर्न ब्रँच ते बेलापूर रस्ता व बेलापूर रस्त्यावरील कालव्यापासून ते वेस या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. याशिवाय ...

श्रीरामपूर शहराच्या विकासासाठी कटिबद्ध
शहरातील महत्त्वाच्या नॉदर्न ब्रँच ते बेलापूर रस्ता व बेलापूर रस्त्यावरील कालव्यापासून ते वेस या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले. याशिवाय वॉर्ड नं. सातमधील मोरगे वस्ती, सूर्यानगर व अनेक भागातील अंतर्गत रस्त्यांची भूमिपूजने करण्यात आली. पुढील टप्प्यात पुन्हा पाच कोटी रुपयांची कामे मंजूर असून, त्याचे भूमिपूजन लवकरच करण्यात येणार आहे. शहराच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असून, कुठलाही भेदभाव न करता प्रत्येक भागात असणाऱ्या अडचणी समजून घेऊन नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जाणार असल्याचे यावेळी आमदार कानडे यांनी स्पष्ट केले.
भविष्यात होणाऱ्या नगरपालिका निवडणुकांना सर्व ताकदीने सामोरे जाण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांना केले.
यावेळी माजी नगराध्यक्षा राजश्री ससाणे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साईबाबा संस्थानचे नवनियुक्त विश्वस्त सचिन गुजर, ज्येष्ठ नेते इंद्रनाथ थोरात, तालुकाध्यक्ष अरुण नाईक, माजी नगराध्यक्ष संजय फंड, जिल्हा सरचिटणीस माऊली मुरकुटे, शहराध्यक्ष संजय छल्लारे, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, दिलीप नागरे, मनोज लबडे, भारती परदेशी, दीपाली ससाणे, रितेश रोटे, ॲड. समीन बागवान, रमेश कोठारी, सुनील बोलके, अभिजित लिपटे, चरणजित सिंग चुग, रावसाहेब आल्हाट, सनी मंडलिक, पुरुषोत्तम मुळे, आशिष धनवटे, नीलेश भालेराव, प्रताप देवरे, नीलेश नागले, मुन्ना परदेशी, अयाज तांबोळी, रियाज पठाण आदी उपस्थित होते.
----
फोटो ओळी : लहू कानडे
शहरातील विकासकामांचे उदघाटन करताना आमदार लहू कानडे.