पाथर्डी शहरात नागरिकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST2021-07-26T04:21:19+5:302021-07-26T04:21:19+5:30

पाथर्डी : नगर परिषद हद्दीतील बोरूडे वस्ती, बालवे वस्ती, साखरे वस्ती या वस्त्यांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी खंडोबा माळ, जुना ...

Citizens' agitation in Pathardi city | पाथर्डी शहरात नागरिकांचे आंदोलन

पाथर्डी शहरात नागरिकांचे आंदोलन

पाथर्डी : नगर परिषद हद्दीतील बोरूडे वस्ती, बालवे वस्ती, साखरे वस्ती या वस्त्यांना पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी खंडोबा माळ, जुना खेर्डे रस्ता या ठिकाणी सांडपाणी वाहून येणाऱ्या पाण्याच्या खड्ड्यात फुटली. त्यामुळे तेच पाणी पुन्हा त्या जलवाहिनीमधून नळाला येत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र बोरुडे यांच्या नेतृत्वाखाली रविवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास जलवाहिनी फुटलेल्या सांडपाण्याच्या खड्ड्यात उतरून आंदोलन करून पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध नोंदविला.

पाथर्डी शहरहद्दीत असलेल्या बोरूडे वस्ती, बाले वस्ती, साखरे वस्ती यासह या परिसरातील वस्त्यांना पिण्याचे पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी खंडोबा माळ परिसरातील रोहाऊसिंगमधून वाहून येणाऱ्या सांडपाण्याच्या डबक्यात फुटली आहे. तसेच त्याच ठिकाण बंद गटारही आहे. जलवाहिनीला पाणी सोडले जाते तेव्हा या जलवाहिनीच्या पाण्याने सांडपाण्याचे डबके भरून वर येते. पाणी बंद केल्यानंतर याच डबक्यातील पाणी पुन्हा त्या जलवाहिनीव्दारे पुढे जात असल्याने तेच पाणी नागरिक पिण्यासाठी वापरतात. या दूषित पाण्यामुळे वस्तीवरील नागरिकांना वेगवेगळे आजारांची भीती निर्माण झाली आहे. या जलवाहिनीचे पाणी पिलेल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर घबराट पसरली आहे.

जलवाहिनी फुटल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र बोरुडे यांनी जलवाहिनी फुटलेल्या सांडपाण्याच्या डबक्यात नागरिकांसह उतरून आंदोलन करत पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. यावेळी निषेध नोंदविला. आंदोलनाची माहिती मिळताच नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी भ्रमणध्वनीवरून राजेंद्र बोरुडे यांच्याशी चर्चा करून तातडीने जलवाहिनी दुरुस्त करण्याचे काम हाती घेतले जाईल, असे आश्वासन दिले. त्यामुळे बोरूडे यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. यावेळी सुभाष साखरे, संजय बोरुडे, राजू बोरुडे, गणेश बालवे आदी उपस्थित होते.

----

फोटो ॲपवर

Web Title: Citizens' agitation in Pathardi city