शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

गोंधळ््याच्या मुलाला गुणांचा मुजरा

By admin | Updated: June 18, 2014 01:24 IST

अहमदनगर : देवीचा गोंधळ आणि खंडेरायाचा जागर करून पारंपरिक लोककला सादर करणाऱ्या कुटुंबातील विनायकने ९४ टक्के गुण मिळवून गुणांचा गोंधळ मांडला आहे.

अहमदनगर : देवीचा गोंधळ आणि खंडेरायाचा जागर करून पारंपरिक लोककला सादर करणाऱ्या कुटुंबातील विनायकने ९४ टक्के गुण मिळवून गुणांचा गोंधळ मांडला आहे. सिमेंटच्या विटा तयार करणाऱ्या आई-वडिलांनी काबाड कष्ट करून विनायकला शिकण्यासाठी बळ दिले. परिस्थितीची जाणीव ठेवत जागरण-गोंधळाचे कार्यक्रम करून थोड्या फार मिळणाऱ्या पैशांची बचत करून वाकोडी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या विनायकने जिद्दीने दहावीच्या परीक्षेत जागर करून यशाचा झेंडा रोवला. स्वकष्टाच्या कमाईतून जीन्सची पॅन्ट घेण्याऐवजी पुस्तके खरेदी केल्याचे विनायक सांगतो.विनायकचे कुटुंब हे मुळचे नेवासा तालुक्यातील सजलपूरचे. त्याचे कुटुंब पारंपरिक पद्धतीने जागरण-गोंधळ करून उदरनिर्वाह करते. पण सध्याच्या जमान्यात या कलेलाही चांगले दिवस राहिले नाहीत. घरातील परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याने पोट भरण्यासाठी विनायकच्या आई-वडिलांनी वाकोडी गाठले. तेथे नगर-सोलापूर रोडवर एका वीट तयार करण्याच्या कारखान्यात ते मजुरी करतात. दिवसभर मजुरी करताना त्यांना जे काही चार पैसे मिळत, त्यातील पहिले ते विनायकच्या शिक्षणासाठी खर्च करायचे. विनायकला या सर्व परिस्थितीची जाणीव होती. यातूनच त्याने अभ्यास करायचा निर्धार केला. शाळेपासून तो राहत असलेले ठिकाण साडेतीन किलोमीटर दूर अंतरावर आहे. शाळेतून घरी आल्यानंतर त्याला कोणीच मित्र नव्हते. दोन-तीन पत्र्याचे घर असल्याने रात्री त्याला घरी अभ्यास करणे कठीण जायचे. तो जवळच असलेल्या जगदंबा देवीच्या मंदिरात जाऊन रात्री अभ्यास करायचा आणि तिथेच झोपायचा. त्याच्या मोठ्या बहिणीनेही चांगले गुण मिळवून शासकीय तंत्रनिकेतनमध्ये प्रवेश मिळविला आहे. शाळांच्या सुट्टीच्या दिवसात तो आजोबांप्रमाणे जागरण-गोंधळाचे कार्यक्रम करायचा. त्यामधून मिळालेले पैसे तो जपून ठेवायचा. त्यामधूनच तो शाळेसाठी लागणारे वह्या-पुस्तके घ्यायचा. त्याला जागरणातील सर्व गाणी येतात. त्याचा नुकताच भंडारा घालण्यात आला. गोंधळ््यांच्या दृष्टीने तो आता ‘वाघ्या’ झाला आहे. म्हणजे जागरण करण्यातील अधिकारी! जेजुरीच्या खंडेरायाचा जागर तो घालतो. कला, संगीत, चित्रकलेची त्याला भारी आवड आहे. मोत्यासारखे त्याचे सुंदर हस्ताक्षर आहे. दहावी झाल्यानंतर अकरावी-बारावीचे शिक्षण त्याला घ्यायचे आहे. पारंपरिक लोककलेतून किती दिवस उदरनिर्वाह करायचा? चांगले शिकून युपीएससी, एमपीएससीच्या परीक्षा द्यायच्या आहेत, असे विनायक सांगतो. (प्रतिनिधी)