सावलीमधील मुलांना मिळाले पतंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST2021-01-15T04:18:05+5:302021-01-15T04:18:05+5:30

अहमदनगर : मकर संक्रांतीनिमित्त रोटरी क्लबने सावली प्रकल्पातील मुलांना पतंगाचे वाटप केले. त्यांनाही तिळ-गूळ देत त्यांच्या मकर संक्रांतीचा आनंद ...

The children in the shade got kites | सावलीमधील मुलांना मिळाले पतंग

सावलीमधील मुलांना मिळाले पतंग

अहमदनगर : मकर संक्रांतीनिमित्त रोटरी क्लबने सावली प्रकल्पातील मुलांना पतंगाचे वाटप केले. त्यांनाही तिळ-गूळ देत त्यांच्या मकर संक्रांतीचा आनंद द्विगुणित केला. यावेळी पोलीस निरीक्षक विकास देवरे यांची उपस्थिती होती.

नगरच्या रोटरी मेन क्लबच्यावतीने मकर संक्रांतीनिमित्त केडगाव येथील सावली प्रकल्पातील विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक विकास देवरे यांच्या हस्ते तिळगुळ वाटप करून भरपूर पतंग देऊन सण साजरा केला. यावेळी क्लबचे अध्यक्ष अमित बोरकर, सचिव पुरुषोत्तम जाधव, प्रशांत बोगावत, दादासाहेब करंजुले, पराग कुलकर्णी, सावलीचे नीतेश बनसोडे उपस्थित होते.

कोरोनाच्या काळात रोटरी कोविड सेंटरच्या माध्यमातून हजारो रुग्णांना मोफत उपचार, निवास व भोजनाची व्यवस्था केली होती. मकर संक्रांत साजरी करतांना सावलीमधील मुलांना पतंग देऊन आपलाही आनंद द्विगुणित करण्याचा उपक्रम आम्ही राबविला, असे बोरकर यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सचिव पुरुषोत्तम जाधव यांनी केले. दादासाहेब करंजुले यांनी सूत्रसंचालन केले.

------

फोटो -१४ सावली

रोटरी मेन क्लबच्यावतीने मकर संक्रांतीनिमित्त सावली प्रकल्पातील मुलांना भरपूर पतंग व तिळगुळ वाटप करताना वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विकास देवरे. क्लबचे अध्यक्ष अमित बोरकर, सचिव पुरुषोत्तम जाधव व पदाधिकारी.

Web Title: The children in the shade got kites