शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

कार चोरणारी टोळी जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 12:23 IST

बनावट चावीच्या मदतीने राज्यभर कारची चोरी करणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या पथकाने औरंगाबाद येथून टोळीतील चौघा सदस्यांना गुुरुवारी ताब्यात घेतले.

श्रीरामपूर : बनावट चावीच्या मदतीने राज्यभर कारची चोरी करणारी टोळी पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांच्या पथकाने औरंगाबाद येथून टोळीतील चौघा सदस्यांना गुुरुवारी ताब्यात घेतले. या प्रकरणात पोलीस वेगाने सूत्रे हलवत आहेत.राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १४ सप्टेंबर रोजी जयदीप भगवान पाथरकर यांची तवेरा कार (एमएच १२ एफके ७१२७) चोरीस गेली होती. राहात्यातील चितळी रस्त्यावर अ‍ॅक्सिस बँकेसमोरून रात्री अडीच वाजेच्या सुमारास बनावट चावीच्या सहाय्याने ती पळविण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.अतिरिक्त पोलीस अधीक्षक रोहिदास पवार यांना मिळालेल्या माहितीवरून गुरुवारी पोलीस पथक औरंगाबादला रवाना करण्यात आले. तेथील कारवाई दरम्यान अब्दुल रहेमान अस्लमबीन शेबे (वय ३०, जहांगिर कॉलनी, हार्सुल, औरंगाबाद), सय्यद रईस सय्यद युनूस (वय ३१, एकतानगर, हार्सुल), आदिनाथ दिलीप जाधव (वय २०, जामगाव कारखाना, ता. गंगापूर), भारत लक्ष्मण दारुंडे (वय २६, अंबेवाडी रोड, गंगापूर) यांना पकडण्यात आले. त्यांनी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. चोरून नेलेली कार औरंगाबाद येथे आरोपी आदिनाथ जाधव यांच्या घराच्या आडोशाला लावलेली आढळली. तसेच आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दोन पल्सर मोटारसायकली तपासासाठी जप्त केल्या आहेत. पुढील तपासासाठी औरंगाबादला पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे. आणखी काही आरोपींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर