शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

पाहुण्या मतदारांची उमेदवारांना डोकेदुखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:18 IST

कोतूळ : ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने परगावी राहणारे मतदार सध्या गावात आले आहेत. दोन्ही बाजूंचा पाहुणचार घेणारे हे ...

कोतूळ : ग्रामपंचायतीच्या निवडणुका असल्याने परगावी राहणारे मतदार सध्या गावात आले आहेत. दोन्ही बाजूंचा पाहुणचार घेणारे हे मतदार मत मात्र कुणाला देणार? याविषयी अनिश्चितता असल्याने हे पाहुणे उमेदवारांना डोकेदुखी ठरत आहेत.

सध्या ग्रामीण भागात ग्रामपंचायत निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. तसेच निवडून येण्यासाठी प्रत्येक मतावर उमेदवारांची नजर आहे. मात्र, मतदार यादीत गावातील पटाईत पुढारी व मतदार नोंदणी कर्मचारी यांच्या कृपेने गेली ४० ते ५० पन्नास वर्षे गावाबाहेर नोकरी, व्यवसायानिमित्त तसेच मोलमजुरीसाठी गेलेले मतदार टिकवून ठेवले आहेत. त्यांची संख्या शंभरीच्या घरात आहे.

हे मतदार विधानसभा, लोकसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये अजिबात दिसत नाहीत. गावाकडील लग्न, सप्ताह, सुख-दुःखाचे प्रसंग, यात्रा यातही कधीच दिसत नाहीत. गावाकडे असलेल्या वृद्ध आई-वडिलांना दिवाळ सणालासुद्धा भेटायला येत नाहीत. केवळ पाच वर्षांतून ग्रामपंचायत निवडणुकीत मात्र न चुकता, न बोलावता आठ दिवस अगोदरच स्वतःहून हजेरी लावतात.

विशेष म्हणजे ते दोन्ही उमेदवारांचा पाहुणचार झोडपतात. त्यांचे शहरी ब्रॅन्ड उमेदवारांना न परवडणारे असतात.

.........

आलटून-पालटून पाहुणचार

विशेष म्हणजे एकाच प्रभागात एका समोर एक असे किमान सहा किंवा अधिक उमेदवार असतात. त्यामुळे आलटून-पालटून एक-दोन दिवसांनी उमेदवारांना गंडवतात. प्रत्येकाकडून जाण्या-येण्याचे भाडे वसूल करतात. कोतूळात एकाच नात्यातील दोन उमेदवार उभे आहेत. त्यांना गंडा घालणारा एक पाहुणा मतदार दोघांच्याही लक्षात आल्याने हे प्रकरण समोर आले. मात्र, निवडणूक संपताच हे पाहुणे आणखी कुठे मतदार आहेत का, याची शोधमोहीम सुरू होणार आहे. शिवाय ग्रामपंचायत निवडणुकीत पन्नास मते निर्णायक ठरत असल्याने आता अशा मतदारांनी निकालाची धाकधूक वाढवली आहे.