शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

अर्ध्या नगर तालुक्याची तहान भागवणारी बुऱ्हाणनगर योजना बंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:27 IST

केडगाव : जवळपास अर्ध्या नगर तालुक्याची तहान भागवणारी बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आर्थिक अडचणीत आली आहे. महावितरणने योजनेतील ...

केडगाव : जवळपास अर्ध्या नगर तालुक्याची तहान भागवणारी बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आर्थिक अडचणीत आली आहे. महावितरणने योजनेतील गावांकडे असणाऱ्या ६० लाखांच्या वसुलीसाठी वीज जोडणी तोडल्याने ही योजना ऐन पावसाळ्यात बंद झाली आहे. योजनेतील समाविष्ट गावांकडे सुमारे साडे ६ कोटींची थकबाकी आहे.

तालुक्यातील ४४ गावांची असणारी बुऱ्हाणनगर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना प्रत्येकवेळी कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीमुळे आर्थिक अडचणीत येत आहेत. मुळा धरणाजवळ बुऱ्हाणनगर योजना व मिरी तिसगाव योजनेचे एकत्रित वीज कनेक्शन आहे. या दोन्ही योजनेत नगर तालुक्यातील ३८, पाथर्डी तालुक्यातील २८, तर राहुरी तालुक्यातील ६ गावांचा समावेश आहे. या दोन्ही योजनांची वीज बिलाची थकबाकी ६० लाखांच्या घरात गेली आहे. या थकबाकीच्या वसुलीसाठी महावितरणने या योजनांचे वीज कनेक्शन तोडल्याने या दोन्ही योजना आता बंद पडल्या आहेत. यामुळे या योजनेतूनन आठवड्यापासून पाणी मिळू शकले नाही.

योजना बंद होऊ नये म्हणून नगर तालुका पंचायत समितीने तातडीने पावले उचलत सर्व थकबाकीपोटी १३ कोटी रुपये आतापर्यंत भरले आहेत. मात्र, थकबाकीची ६० लाखांची रक्कम भरल्याशिवाय योजनांचे वीज कनेक्शन सुरू होणार नाही, असा पवित्रा महावितरणने घेतला आहे. नगरपंचायत समितीने आज तातडीने योजनेतील समाविष्ट गावांतील ग्रामसेवकांची बैठक घेऊन थकबाकीचा धनादेश भरण्याचे आदेश दिले आहेत. थकबाकीपोटी नगर तालुक्याने आतापर्यंत १४ कोटी रुपयांचा भरणा केला आहे. मात्र, राहुरी व पाथर्डीमधील थकबाकीमुळे योजनेची आर्थिक अडचण वाढली आहे.

----------------------

वीजबिलाच्या वसुलीसाठी महावितरणने बुऱ्हाणनगर योजनेचे वीज कनेक्शन बंद केले आहे. जी गावे नियमित बिल भरतात त्यांच्यावरही अन्याय होत आहे. ज्या गावांकडे मोठी थकबाकी आहे, त्यांचा पाणी पुरवठा कमी करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.

-संदेश कार्ले, अध्यक्ष घोसपुरी पाणी पुरवठा योजना समिती

-------------------

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच संबंधित अधिकारी यांची बैठक होऊन जोपर्यंत ग्रामपंचायतीकडे असणारी वीजबिलाची माहिती येत नाही, तोपर्यंत कनेक्शन कट करू नये, असे आदेश दिले असताना महावितरणने बुऱ्हाणनगर पाणी योजनेचे कनेक्शन कट केले आहे. वास्तविक नगरपंचायत समितीने जवळपास १३ कोटी रुपये वीजबिलापोटी भरले आहेत. कनेक्शन कट झाले आहे; पण अधिकारी वर्गाला याची चिंता नाही.

-रामदास भोर, माजी सभापती