जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथील बाळू अशोक खाडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूमच्या कपाटात उचकापाचक करून त्यातील एक लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेला. भरदिवसा दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. दुसरीकडे मारुती भगवान गंभीरे (वंजारवाडी) यांच्या खर्डा-सोनेगाव रस्त्यावर शेती अवजारे विक्रीच्या दुकानातून ४३ हजार ३६० रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटर, मोटरीची केबल, सबमर्सिबल केबल, तांब्याची वायडिंग तार व इलेक्ट्रिक वजनकाटा असा ऐवज चोरट्यांनी रात्री दुकानाचे शटर तोडून लंपास केला. त्यानंतर पोलिसांनी अहमदनगर येथून श्वानपथकाला पाचारण केले. परंतु सुगावा लागला नाही.
वंजारवाडी व दरडवाडी या दोन्ही चोरीच्या गुन्ह्याची फिर्याद जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.