भरदिवसा घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST2021-08-25T04:27:17+5:302021-08-25T04:27:17+5:30
जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथील बाळू अशोक खाडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूमच्या कपाटात उचकापाचक करून ...

भरदिवसा घरफोडी
जामखेड तालुक्यातील दरडवाडी येथील बाळू अशोक खाडे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूमच्या कपाटात उचकापाचक करून त्यातील एक लाखाचे सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा ऐवज चोरून नेला. भरदिवसा दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान ही चोरीची घटना घडली. दुसरीकडे मारुती भगवान गंभीरे (वंजारवाडी) यांच्या खर्डा-सोनेगाव रस्त्यावर शेती अवजारे विक्रीच्या दुकानातून ४३ हजार ३६० रुपये किमतीची इलेक्ट्रिक मोटर, मोटरीची केबल, सबमर्सिबल केबल, तांब्याची वायडिंग तार व इलेक्ट्रिक वजनकाटा असा ऐवज चोरट्यांनी रात्री दुकानाचे शटर तोडून लंपास केला. त्यानंतर पोलिसांनी अहमदनगर येथून श्वानपथकाला पाचारण केले. परंतु सुगावा लागला नाही.
वंजारवाडी व दरडवाडी या दोन्ही चोरीच्या गुन्ह्याची फिर्याद जामखेड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.