शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
2
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
3
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
4
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
5
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
6
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
7
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
8
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
9
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
10
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
11
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
12
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
13
CM देवेंद्र फडणवीसांनी चालवलेली बुलेट कुणाची? PUC वरून काँग्रेस-भाजपात का जुंपली?
14
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
15
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
16
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
17
अंगावर शहारा आणणारी घटना! वादळात टीनशेडसोबत 'नन्हे मियाँ'ही उडाले अन्...; थरार कॅमेऱ्यात कैद -  बघा VIDEO
18
PM मोदींच्या आवाहनाला गडकरींचाही प्रतिसाद, बसने प्रवास करत केली पालखी महामार्गाच्या कामांची पाहणी; दौरा सुरू असतानाच...
19
PBKS vs MI : भावा कसा आहेस? रोहित शर्मा-श्रेयस अय्यरचा व्हिडिओ पाहिलात का?
20
Raj Thackeray : “२२ लाख मुलांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं त्याचं काय?”, राज ठाकरेंचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षणाचे जनक शाहू महाराजांच्या स्मृतींना उजाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:22 IST

छत्रपती शाहू महाराजांचे वडील छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे नगरमध्ये स्मारक असून त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात करत शाहू महाराज ...

छत्रपती शाहू महाराजांचे वडील छत्रपती चौथे शिवाजी महाराजांचे नगरमध्ये स्मारक असून त्याच्या नूतनीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात करत शाहू महाराज आणि आरक्षणाच्या घोषणेच्या स्मृती जागवण्यात आल्या. यावेळी आमदार संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, स्थायी समितीचे माजी सभापती सचिन जाधव, नगरसेवक विनीत पाऊलबुद्धे , अजिंक्य बोरकर, डॉ. प्रशांत पटारे, डॉ. सतीश सोनावणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गजानन भांडवलकर, आबासाहेब सोनावणे, रामकृष्ण कर्डिले, शहर अभियंता सुरेश इथापे, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष संपूर्णा सावंत, सुरेखा कडूस, डॉ. अविनाश मोरे, रिनूल नागवडे, इतिहास प्रेमी अभिजित दरेकर, विनीत गाडे, यशवंत तोडमल, धिरज कुमटकर, ऋषिकेश दुसंगे, विकी रोहोकले, सुरज भोर, सागर कराळे, महेश भोर, शुभम आठरे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्सचा गुणवंत विद्यार्थी चित्रकार प्रदीप पवार यांचे लाईव्ह पेंटिंग सर्वांच्या चर्चेचा विषय ठरला.

सूत्रसंचालन संघटनेचे अध्यक्ष यशवंत तोडमल यांनी केले. आमदार जगताप यांच्या स्थानिक विकास निधीतून सुशोभीकरणाचे काम होत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सुशोभीकरण सोबतच या स्मारकाला सुंदर कमान असावी, अशी संकल्पना ही त्यांनी मांडली. याला उपस्थितांनी सहमती दर्शवत अन्य कोणा यंत्रणेकडून हे काम होणार नसेल तर लोकवर्गणीतून ती करू, अशी भूमिका उपमहापौर भोसले यांनी मांडली.

आमदार जगताप यांनी संघटना आणि समिती तर्फे सुरू असलेल्या कामाचे कौतुक केले. शहरात अनेक ऐतिहासिक महत्व असलेल्या वास्तू आणि ठिकाणे आहेत. त्याचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्याची गरज असल्याचे जगताप म्हणाले. डॉ. अविनाश मोरे यांनी आभार मानले.

----------

फोटो -२६शाहू महाराज

छत्रपती चौथे शिवाजी महाराजांच्या स्मारक सुशोभीकरण कामाचा शुभारंभ करताना आमदार संग्राम जगताप.