टाकळी कडेवळीत आढळलेला मृतदेह पुण्याचा, दोन संशियत ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 18:24 IST2021-02-12T18:24:04+5:302021-02-12T18:24:29+5:30

टाकळी कडेवळीत शिवारातील दिनकर घोडके यांच्या शेताजवळ चार दिवसापूर्वी सापडलेला मृतदेह पुण्यातील असल्याचे सिध्द झाले आहे. अनैतिक संबंधातून खून करुन खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी हा मृतदेह टाकळी कडेवळीत शिवारातील जमिनीत पुरला होता. याबाबत अवघ्या चार दिवसात पोलिसांना तपासात धागेदोरे मिळाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.

Body found near Takli in Pune, two suspects in custody | टाकळी कडेवळीत आढळलेला मृतदेह पुण्याचा, दोन संशियत ताब्यात

टाकळी कडेवळीत आढळलेला मृतदेह पुण्याचा, दोन संशियत ताब्यात

श्रीगोंदा : तालुक्यातील टाकळी कडेवळीत शिवारातील दिनकर घोडके यांच्या शेताजवळ चार दिवसापूर्वी सापडलेला मृतदेह पुण्यातील असल्याचे सिध्द झाले आहे. अनैतिक संबंधातून खून करुन खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी हा मृतदेह टाकळी कडेवळीत शिवारातील जमिनीत पुरला होता. याबाबत अवघ्या चार दिवसात पोलिसांना तपासात धागेदोरे मिळाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना संशयावरून ताब्यात घेतले आहे.

सोमवारी दुपारी टाकळी शिवारात ५५ वर्षीय इसमाचा शिर नसलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावर पोलीस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली.

पोलीस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी नातेवाईकांकडे याबाबत विचारपूस केली. मृतदेहाला शिर नव्हते. त्यामुळे पोलीस डीएनए अहवालाशिवाय अधिकृतपणे कोणतीही माहिती जाहीर करणार नाहीत, असे पोलीससूत्रांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी मुंबई, पुण्याला पथके रवाना केली आहेत.

Web Title: Body found near Takli in Pune, two suspects in custody