अकोलेत शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:16 IST2021-07-15T04:16:27+5:302021-07-15T04:16:27+5:30

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने रक्तदान शिबिरात पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील सर्व पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, तहसीलदार, ...

Blood donation camp organized in Akole on Friday | अकोलेत शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

अकोलेत शुक्रवारी रक्तदान शिबिराचे आयोजन

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने रक्तदान शिबिरात पुढाकार घेतला आहे. तालुक्यातील सर्व पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना, तहसीलदार, नगरपंचायतने मुख्याधिकारी, गट विकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, पोलीस, साखर कामगार, ग्रामसेवक व शिक्षक संघटना, अभिनव परिवार, पतसंस्था, अकोले तालुका पत्रकार संघ या रक्तदान शिबिरात सहभागी होऊन योगदान देणार आहेत.

रक्तदान शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन आमदार डॉ. किरण लहामटे. शेतकरी नेते मधुकरराव नवले, राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दादा पाटील वाकचौरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भानुदास तिकांडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, शिवसेनेचे शहरप्रमुख नितीन नाईकवाडी, अभिनव परिवाराचे विक्रम नवले, महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शोभा निर्गुडे, नाभिक संघटनेचे किरण चौधरी, तहसीलदार मुकेश कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, मुख्याधिकारी विक्रम जगदाळे, शिक्षक संघटनेचे राजेंद्र सदगीर, बाळासाहेब आरोटे, नवलेवाडीचे सरपंच विकास नवले यांनी केले आहे.

Web Title: Blood donation camp organized in Akole on Friday