राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपचा रास्ता रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:27 IST2021-08-25T04:27:02+5:302021-08-25T04:27:02+5:30

यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. राणे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून ठाकरे सरकारने ...

Block BJP's way to protest Rane's arrest | राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपचा रास्ता रोको

राणेंच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपचा रास्ता रोको

यानंतर पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना निवेदन देऊन आंदोलन मागे घेण्यात आले. राणे यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून ठाकरे सरकारने खोटे गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली, असे निवेदनात म्हटले आहे. याचा निषेध म्हणून खर्डा चौक येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रस्ता रोको आंदोलनात भाजप तालुकाध्यक्ष अजय काशीद, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शरद कार्ले, जिल्हा उपाध्यक्ष संजय कार्ले, सोमनाथ राळेभात, वैभव कार्ले, सादिक बागवान, मोहन गडदे, प्रवीण बोलभट, ईश्वर हुलगुंडे, तात्याराम पोकळे, विकी घायतडक, शिवकुमार डोंगरे, नानासाहेब आव्हाड, अजय सातव, बाळासाहेब गायकवाड, प्रवीण होळकर, अभिजित राळेभात, कैलास नेटके, मोहन देवकते, अर्जुन म्हेत्रे, भास्कर गंभीरे, पप्पू काशीद, चंदू कार्ले आदी उपस्थित होते.

---------

फोटो - २४ जामखेड बीजेपी

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेच्या निषेधार्थ भाजपच्या कार्यकर्त्यांनी खर्डा चौकात रस्ता रोको आंदोलन केले.

Web Title: Block BJP's way to protest Rane's arrest