शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
2
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
4
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
5
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
6
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
7
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
8
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
9
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
10
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
11
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
12
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
13
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
14
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
15
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
16
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
17
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
18
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
19
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
20
...तेव्हाच मुंबई, गोवा ड्रग्जमुक्त होऊ शकेल; इथे दबा धरून बसलेत हजारो सलीम डोला
Daily Top 2Weekly Top 5

श्रीगोंद्याच्या उपनगराध्यक्षपदी भाजपच्या मनीषा लांडे बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST

नव्याने निवडून आलेल्या सर्वांना संधी देण्याची भूमिका आ. बबनराव पाचपुते यांनी यापूर्वीच स्पष्ट केली होती. पाच नगरसेवक हे पहिल्यांदाच ...

नव्याने निवडून आलेल्या सर्वांना संधी देण्याची भूमिका आ. बबनराव पाचपुते यांनी यापूर्वीच स्पष्ट केली होती. पाच नगरसेवक हे पहिल्यांदाच निवडून आलेले आहेत. या पंचवार्षिकमधील राहिलेल्या महिन्यांचे समान वाटप करत सर्वांना दहा दहा महिने संधी देण्यात येत आहेत. रमेश लाढाणे यांचा कालावधी पूर्ण झाल्याने त्यांनी राजीनामा दिला. मनीषा लांडे, संग्राम घोडके, ज्योती खेडकर व दीपाली औटी यांची नावे उपनगराध्यक्षपदासाठी आघाडीवर होती. या चारही जणांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकण्यात आल्या. त्यात लांडे यांचे नाव निघाले. त्यानंतर भाजपकडून मनीषा लांडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. काँग्रेस आघाडीकडून संतोष पोपटराव कोथिंबिरे यांनी अर्ज दाखल केला, मात्र अपुऱ्या संख्याबळाचा विचार करता कोंथिबिरे यांनी माघार घेतल्याने लांडे यांची बिनविरोध निवड झाली.

प्रांताधिकारी सुधाकर भोसले यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. लांडे यांचे निवडीबद्दल आमदार बबनराव पाचपुते, मुख्याधिकारी मंगेश देवरे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, भाजपच्या गटनेत्या छायाताई गोरे, मावळते उपनगराध्यक्ष रमेश लाढाणे यांनी कौतुक केले.

---------

फोटो - २८मनिषा लांडे