शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणासाठी भाजपचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:16 IST

अहमदनगर : राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत योग्य कार्यवाही न केल्याने राज्यात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. ...

अहमदनगर : राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत योग्य कार्यवाही न केल्याने राज्यात ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण संपुष्टात आले आहे. राज्यातील ओबीसी समाजावर हा मोठा अन्याय झाला आहे. या निषेधार्थ भाजपाच्या जिल्हा ओबीसी आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.

ओबीसी आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात आ. बबनराव पाचपुते, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, जिल्हाध्यक्ष संतोष रायकर, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, युवराज पोटे, ज्ञानेश्वर काळे, नारायण धोंगडे, आशा वाघ, संगीता घोडेकर, बाळासाहेब गाडेकर, अशोक गोरे, सचिन भैरवकर, सचिन पारखी, अनिल गट्टाणी आदींसह भाजपाच्या ओबीसी आघाडीचे सर्व तालुक्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध करण्यात आला.

यावेळी प्रकाश चित्ते म्हणाले, ‘‘लवकरात लवकर राज्य मागासवर्गीय आयोगाचे गठण करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता; मात्र न्यायालयाच्या या आदेशाला आता जवळपास पंधरा महिने उलटून गेले आहेत. तरीही राज्य मागासवर्गीय आयोगाचे अधिकृत गठन झालेले नाही. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्यावतीने अनेक वेळा राज्य सरकारला पत्र दिले; मात्र या सरकारला ओबीसी समाजाबद्दल काहीही देणे-घेणे नसल्याचे दिसते आहे. राजकीयदृष्ट्या ओबीसींना संपविण्याचा कट आघाडी सरकार करत आहे.’’

आ. बबनराव पाचपुते म्हणाले, ‘‘राज्यातील सरकार हे विकृतीने आलेले आहे. मराठा व ओबीसी समाजावर मोठा अन्याय करत आहे. मराठा व ओबीसींना आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी आता आरपार लढाई देण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.’’

बाळासाहेब मुरकुटे म्हणाले, ‘‘माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगल्या प्रकारे कागदपत्रांची पूर्तता केली होती; मात्र राज्य सरकारने मराठा व ओबिसीबाबत चुकीचे निर्णय घेतल्याने अडचणीत आणले आहे. या उदासी सरकारने दोन्ही समाजांचे आरक्षण संपुष्टात आणले आहे.

-------------------------------------

फोटो - 03 bjp obc

भाजप ओबीसी आघाडीच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयवर निदर्शने करण्यात आली. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते, आ.बबनराव पाचपुते, बाळासाहेब मुरकुटे आदी.