शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
4
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
5
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
6
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
7
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
8
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
9
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
10
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
11
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
12
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
13
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
14
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
15
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
16
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
17
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
18
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
19
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
20
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
Daily Top 2Weekly Top 5

जलसंधारणासाठी भूमिपुत्र सरसावले!

By admin | Updated: July 20, 2016 00:18 IST

अहमदनगर : नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावाजवळील सोढाळा नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम भूमिपुत्रांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आले आहे.

अहमदनगर : नगर तालुक्यातील रुईछत्तीसी गावाजवळील सोढाळा नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम भूमिपुत्रांच्या पुढाकाराने हाती घेण्यात आले आहे. या उपक्रमातून गाव भविष्यात हरित होण्याचे संकेत आहेत. पावसाअभावी सहा वर्षापासून रुईछत्तीसी भागात दुष्काळीस्थिती आहे. शेतकऱ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे या ध्येयाने गावातील विविध पदांवर काम करणारांची यादी तयार करुन व्हॉटस्अपवर ‘आम्ही रुईकर’ हा ग्रुप स्थापन केला. व गावात जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय घेतला. सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी धर्माजी भांबरे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी भानुदास हजारे, अ‍ॅड. लक्ष्मण गोरे, ग्रामविकास अधिकारी अशोक जगदाळे, ज्ञानेश्वर हजारे, शिक्षक दत्तात्रय काळे, विकास गोरे, गोरख गोरे, पांडुरंग गोरे, जालिंदर खाकाळ, चंद्रकांत भवर, सुभाष गोरे, संतोष भवर, संतोष भांबरे, दादाराम हजारे यांनी पुढाकार घेऊन अडीच लाखाचा निधी गोळा करुन नदीचे खोलीकरण व रुंदीकरणाचा निर्णय घेतला व या कामाचा शुभारंभ जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते झाला. आंबिल ओढ्यावरील बंधारा गाळाने भरला असून हा गाळ काढण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. त्यासाठी निम्मा आर्थिक भार उचलण्याचे ठरले. शेतकऱ्यांचे सहकार्य मिळाल्यास संपूर्ण शिवारात जलसंधारणाची कामे करण्याचा मानस या भूमिपुत्रांचा आहे. सेवानिवृत्त कृषी अधिकारी भानुदास हजारे यांचे चिरंजीव प्रवीण व अक्षय यांनी यासाठी १ लाख ५१ हजाराची देणगी दिली. गावातील मंडळे वृक्षारोपणाचा उपक्रम राबविणार आहेत. (तालुका प्रतिनिधी)