भायगावला कोरोना याेद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:22 IST2021-09-18T04:22:34+5:302021-09-18T04:22:34+5:30

भातकुडगाव : भायगावमध्ये (ता. शेवगाव) पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या हस्ते विठ्ठल प्रल्हाद आढाव यांचा कोरोनायोद्धा पुरस्काराने ...

Bhaigaon honored with Corona Warriors | भायगावला कोरोना याेद्ध्यांचा सन्मान

भायगावला कोरोना याेद्ध्यांचा सन्मान

भातकुडगाव : भायगावमध्ये (ता. शेवगाव) पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या हस्ते विठ्ठल प्रल्हाद आढाव यांचा कोरोनायोद्धा पुरस्काराने सन्मान करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे संजय कोळगे, जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, तालुका कृषी अधिकारी एस. ए. चव्हाण, जनार्दन लांडे, दिगंबर शिलेदार, अनिल मडके, कल्याण आढाव, राजेश फटांगरे, प्रदीप मगर, बाळासाहेब काळे, अशोक मेरड, सागर चव्हाण, अशोक दुकळे, लक्ष्मण लांडे, कडुबाळ दुकळे, रोहिणी साबळे, कीर्तनकार प्रतिभा शेळके आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. घुले यांनी आढाव यांनी कोरोनाकाळात केलेल्या कार्याचे कौतुक केले. प्रत्येकाने त्यांच्या कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन केले. सरपंच अशोक दुकळे यांनी सूत्रसंचालन केले.

---

१७ भायगाव

भायगाव येथे विठ्ठल आढाव यांचा सभापती डॉ. क्षितिज घुले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Web Title: Bhaigaon honored with Corona Warriors