ग्राहक पंचायतीच्या वतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST2021-07-29T04:21:44+5:302021-07-29T04:21:44+5:30

श्रीरामपूर : ग्राहक पंचायतीने टपाल सेवकांचा कोरोना योद्धा म्हणून केलेला सन्मान टपाल खात्याला प्रेरणा देणारा आहे, असा गौरव येथील ...

On behalf of the Consumer Panchayat | ग्राहक पंचायतीच्या वतीने

ग्राहक पंचायतीच्या वतीने

श्रीरामपूर : ग्राहक पंचायतीने टपाल सेवकांचा कोरोना योद्धा म्हणून केलेला सन्मान टपाल खात्याला प्रेरणा देणारा आहे, असा गौरव येथील टपाल कार्यालयातील उपअधीक्षक आर. पी. झावरे यांनी केला. कोरोना काळात केलेल्या सेवेबद्दल टपाल सेवक तसेच रुग्णांना स्वखर्चाने भोजन देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा नुकताच सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी झावरे बोलत होते. टपाल खात्याचे प्रबंधक सागर आढाव, ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. गोरख बारहाते यावेळी उपस्थित होते.

कोरोना रुग्णांच्या जवळ जाण्यास कोणीही तयार नव्हते. अशा वेळी कुटुंबीयांचा विरोध पत्करून काही कार्यकर्त्यांनी रुग्णांना अन्न पुरविले. हे पवित्र काम असल्याचे पंचायतीचे सल्लागार अनिल कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी प्रवासी संघटनेचे रणजित श्रीगोड, विजय कोल्हे, भाऊसाहेब शिंदे, जीवन पांडे, जी.एन.दौंड, अनिता आहेर, कमलकिशोर मुंदडा, राणीप्रसाद तर्हाळ, रमेश चंदन, चंद्रकांत कुलकर्णी, सुरेंद्र पाटील, किरण घोलप, महावीर राका, राजेश मोरे, हेमंत पंखेवाले, कल्पेश चोरडिया उपस्थित होते.

--------

Web Title: On behalf of the Consumer Panchayat