बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे आज कर्ज मेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST2021-09-07T04:27:24+5:302021-09-07T04:27:24+5:30

अहमदनगर : कोरोना महामारीमुळे ग्राहकांची लांबलेली स्वप्ने त्वरित साकारण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, अहमदनगर झोनल ऑफिसतर्फे मंगळवारी (दि. ७) हॉटेल ...

Bank of Maharashtra should meet today | बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे आज कर्ज मेळावा

बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे आज कर्ज मेळावा

अहमदनगर : कोरोना महामारीमुळे ग्राहकांची लांबलेली स्वप्ने त्वरित साकारण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्र, अहमदनगर झोनल ऑफिसतर्फे मंगळवारी (दि. ७) हॉटेल ऑरस, नगर-मनमाड रोड, सावेडी, अहमदनगर येथे रिटेल व एमएसएमई एक्स्पो आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये ग्राहकांना योग्य मार्गदर्शन, कागदपत्रांची छाननी व शंकांचे निरसन करून त्वरित निर्णय देणार आहे. सध्या कमी झालेल्या व्याजदराचा फायदा ग्राहकांना मिळणार आहे. बँक ऑफ महाराष्ट्रचे व्याजदर कमी व स्पर्धात्मक आहेत. त्यामुळे ग्राहकांचा महाबँकेकडून कर्ज घेण्यास ओढा व कल आहे. गृहकर्ज व कार कर्जाला ३० सप्टेंबरपर्यंत प्रोसेसिंग फी नाही. तसेच गृहकर्जाला दोन हप्त्यांची सूट दिली आहे. गेल्या तिमाहीत महाबँकेचा कर्ज मंजुरीचा वेग वाढला आहे. बँक ग्राहकांना व्याजदराचा फायदा घेण्यासाठी दुसऱ्या बँकेतील कर्ज टेक ओव्हर करीत आहे. जुन्या व नवीन कर्जदारांना टॉप अप लोन देत आहे. या रिटेल व एमएसएमई एक्स्पोत गृहकर्ज, वाहन कर्ज, सोनेतारण कर्ज, शैक्षणिक कर्ज, वैयक्तिक कर्ज, विविध व्यवसाय कर्ज योजनांचे सखोल मार्गदर्शन करून त्वरित निर्णय देणार आहे. या मेळाव्यात सरकारी योजनांची माहिती दिली जाणार आहे. (वा. प्र.)

Web Title: Bank of Maharashtra should meet today