नवनाथ सायकर यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST2021-07-26T04:21:41+5:302021-07-26T04:21:41+5:30

कर्जत : तालुक्यातील खैदाणवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी नवनाथ नामदेव सायकर यांना द्राक्ष फळबागेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृषी विभागाच्या ...

Awarded District Level Outstanding Farmer Award to Navnath Saikar | नवनाथ सायकर यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान

नवनाथ सायकर यांना जिल्हास्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान

कर्जत : तालुक्यातील खैदाणवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी नवनाथ नामदेव सायकर यांना द्राक्ष फळबागेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल कृषी विभागाच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी हा पुरस्कार देऊन तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी शेतकरी उपस्थित होते.

तालुक्यातील खैदाणवाडी या भागात खडकाळ माळरानावर द्राक्ष बाग लावली. ती उत्तमरित्या फुलविली. नवनाथ सायकर यांच्या बागेतील दर्जेदार द्राक्षे विदेशात गेले. कर्जत तालुका कृषी विभागाने नेहमीच सहकार्य करून प्रोत्साहन दिले. यामुळे सतरा वर्षांपासून ते द्राक्ष बाग फुलवत आहेत. शिवाय त्यांचे अनुभव प्रयोग ते कर्जत जामखेड तालुक्यासह जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदारांबरोबर शेअर करत आहेत. नवनाथ सायकर यांच्यामुळे अहमदनगर, सोलापूर, पुणे जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र वाढले. उत्पादनही वाढले. त्यांनी केलेल्या या आदर्श कामाची दखल कृषी विभागाने घेतली व त्यांना गेल्या वर्षीचा जिल्ह्यातील उत्कृष्ट शेतकरी हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर, मंडल कृषी अधिकारी संजय घालमे, रामदास राऊत, कृषी सहायक दत्तात्रय सुद्रीक, रावसाहेब डमरे, संतोष सुरवसे, लक्ष्मण अनारसे, चंद्रकांत तांदळे, कृषी पर्यवेक्षक संदीप पवार यांच्यासह संजय मोढळे, अतुल गदादे, विष्णू हिवरे, प्रकाश सायकर, अनिल खराडे आदी शेतकरी उपस्थित होते.

----

२५ सायकर

खैदाणवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी नवनाथ सायकर यांना गेल्या वर्षीचा उत्कृष्ट शेतकरी म्हणून जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करताना कर्जत तालुका कृषी अधिकारी दीपक सुपेकर.

Web Title: Awarded District Level Outstanding Farmer Award to Navnath Saikar