शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत समिती कर्मचाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST

नेवासा : तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांवर ऑडिओ बॉम्बचा वापर वाढत आहे. पोलीस कर्मचाऱ्यानंतर आता पंचायत समिती कर्मचाऱ्याचा संदिग्ध ऑडिओ व्हायरल ...

नेवासा : तालुक्यात शासकीय अधिकाऱ्यांवर ऑडिओ बॉम्बचा वापर वाढत आहे. पोलीस कर्मचाऱ्यानंतर आता पंचायत समिती कर्मचाऱ्याचा संदिग्ध ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर तालुक्यात पुन्हा खळबळ उडाली आहे. यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी निवेदन देत अधिकाऱ्यांना जाब विचारला.

बचत गटाचे लाभार्थी आणि पंचायत समिती अधिकारी यांचे ‘प्रत्येकी एक हजार रुपये मागितल्याप्रमाणे द्यावेत’ अशा अर्थाची ऑडिओ क्लिप दोन- तीन दिवसांपासून तालुक्यात सोशल मीडियावर धुमाकूळ घालीत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपच्या कार्यकर्त्यांनी पंचायत समितीमध्ये या प्रकरणाच्या चौकशीसाठी निवेदन दिले.

दोन-तीन दिवसांपूर्वी कांगोनी येथील एकाने एका अधिकाऱ्याशी फोनवर चर्चा केली. त्यामध्ये त्या अधिकाऱ्याने ४० हजार रुपये कर्ज घेण्यासाठी एक हजार रुपये द्यावे लागेल, अशी स्पष्टपणे मागणी केली. प्रत्येक सदस्याकडून एक हजार रुपये जमा केले. तालुक्यामध्ये जवळपास बचत गटाच्या १२ हजार महिला सदस्या आहेत. त्यामुळे ही दिसणारी एक हजार रुपयांची रक्कम म्हणजे कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार आहे आणि हे धागेदोरे कोणापर्यंत जातात हा प्रश्न जनतेला पडला आहे, असे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष प्रताप शिंदे, किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश शेटे, शहर युवा मोर्चा अध्यक्ष प्रतीक शेजूळ, आकाश देशमुख, बंडू शिंदे, युवा मोर्चाचे उपाध्यक्ष उमेश चावरे, सोशल मीडियाचे अध्यक्ष आदिनाथ पटारे, संघटन सरचिटणीस अमोल कोलते आदी उपस्थित होते.