लग्नाचे आमिष दाखवून केले अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:25 IST2021-09-06T04:25:42+5:302021-09-06T04:25:42+5:30

तुळशीराम ऊर्फ राजू पोपट वायकर, सईबाई वायकर व हिराबाई वायकर अशी आरोपींची नावे आहेत. तुळशीराम वायकर हा तालुका पोलीस ...

Atrocities committed by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून केले अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून केले अत्याचार

तुळशीराम ऊर्फ राजू पोपट वायकर, सईबाई वायकर व हिराबाई वायकर अशी आरोपींची नावे आहेत. तुळशीराम वायकर हा तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. शुक्रवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपी वायकर याचे पाच वर्षांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. त्यानंतर वायकर याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. श्रीरामपूरसह शिर्डी व बाभळेश्वर येथे तिच्यावर वारंवार शारीरिक अत्याचार केले. तरुणीला गर्भपात करण्यास भाग पाडले. पीडितेने वायकर याच्या घरी हा प्रकार सांगितला. मात्र त्यावेळी वायकर याचा पहिला विवाह झाला असल्याचे तिला समजले. आरोपी वायकरसह त्याच्या आई व पत्नीने आपल्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी संगमनेर येथील पोलीस उपाधीक्षक राहुल मदने अधिक तपास करत आहे.

.............

Web Title: Atrocities committed by showing the lure of marriage