शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
3
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
4
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
5
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
6
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
7
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
8
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
9
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
10
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
11
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
12
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
13
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
14
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
15
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
16
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
17
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
18
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
19
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
20
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेचे रण पेटले

By admin | Updated: March 26, 2024 15:09 IST

अकोले : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्धार केला असून, येत्या काही दिवसांत त्यांचा प्रवेश निश्चित समजला जातआहे.

अकोले : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोक भांगरे यांनी शिवसेना प्रवेशाचा निर्धार केला असून, येत्या काही दिवसांत त्यांचा प्रवेश निश्चित समजला जातआहे. ठाकरे देतील ती जबाबदारी स्वीकारू, असे सांगत त्यांनी या चर्चेला दुजोराही दिला. परंतु भांगरेंच्या या भूमिकेमुळे स्थानिक सेना पदाधिकार्‍यांची अस्वस्थता वाढली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीने सगळीकडेच उलथापालथ झाली. पक्षादेश किंवा आघाडी धर्म झुगारून अनेक पदाधिकार्‍यांनी आपापली गणिते जुळवण्याचा प्रयत्न केला. अकोल्यातही असेच काहिसे घडले. आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांचे काँग्रेस, तसेच राष्ट्रवादी नेत्यांच्या बालेकिल्ल्यातच मताधिक्य घटले. भांगरे मित्रमंडळाने सेनेच्या विजयाचे अभिनंदन करणारे ‘फ्लेक्स’ शहरभर झळकावून उघडउघड युतीला मदत केल्याचे संकेत दिले. नंतर खुद्द अशोक भांगरे यांनी सेनेत जाण्याची इच्छा व्यक्त केली. यामागे आगामी विधानसभेत सेनेकडून उमेदवारी मिळवण्याची त्यांची आकांक्षा लपून राहिलेली नाही. नेमक्या याच कारणातून सेना उपजिल्हा प्रमुख मधुकर तळपाडे गटात कमालीची अस्वस्थता आहे. आपणच उमेदवारीचे दावेदार असल्याचे सांगून तळपाडे यांनी सावध भूमिका घेतली आहे. भांगरे यांनी आगामी उमेदवारीच्या महत्वाकांक्षेतून सेनेत प्रवेशाचा निर्धार केला असला तरी आज ते त्यावर उघड भाष्य करीत नाहीत. प्रवेशानंतर सेनाप्रमुख उद्धव ठाकरे देतील ती जबाबदारी पार पाडू, असे सांगत त्यांनी वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका घेतल्याचे सध्या तरी दिसते. (तालुका प्रतिनिधी) भांगरे घराण्याने पिचडांच्या विरोधात गेली ३०-४० वर्षे निवडणुका लढविल्या आहेत. २००४ला मी सेनेकडून निवडणूक लढविली. अवघ्या दोन-अडीच हजार मतांनी पराभव झाला. पुन्हा सेनेने उमेदवारी दिली तर लढू. नाहीतर शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे जी जबाबदारी देतील ती स्वीकारु - अशोक भांगरे, ज्येष्ठ नेते, काँग्रेस अकोल्यात लागलेले फ्लेक्स दिशाभूल करणारे आहेत. सेनेचे संपर्क प्रमुख सुहास सामंत यांच्याशी बोलणे झाले असून आगामी विधानसभेसाठी मीच प्रमुख दावेदार आहे- - मधुकर तळपाडे, उपजिल्हा प्रमुख, शिवसेना भांगरे मित्रमंडळाने माझा फोटो मला न विचारता फ्लेक्सवर छापला आहे. आमचे नेते मधुकर तळपाडे आहेत. या निवडणुकीत महायुती पुढेच आहे. राजकारणात काहीही होऊ शकते! विधानसभेची उमेदवारी कुणाला मिळेल हे सांगता येत नाही. - मछिंद्र धुमाळ, तालुकाप्रमुख, शिवसेना