श्रीरामपूर बंद यशस्वी करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:21 IST2021-09-25T04:21:02+5:302021-09-25T04:21:02+5:30
दिल्ली येथे दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात जवळपास ७०० शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. शेतीमालाचा हमीभावाची कृषी कायद्यात तरतूद नाही ...

श्रीरामपूर बंद यशस्वी करण्याचे आवाहन
दिल्ली येथे दहा महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात जवळपास ७०० शेतकर्यांचा मृत्यू झाला आहे. शेतीमालाचा हमीभावाची कृषी कायद्यात तरतूद नाही तसेच अन्नधान्यांच्या किमती वाढून अन्नसुरक्षा धोक्यात येण्याची शक्यता समितीने व्यक्त केली आहे. त्यामुळे श्रीरामपूर शहर व तालुक्यातील शेतकरी, व्यापा-यांनी बंद यशस्वी करावा, असे आवाहन सर्वोद्योग कामगार संघटनेचे नागेश सावंत, श्रमिक शेतकरी संघटनेचे कॉ. राजेंद्र बावके, श्रीकृष्ण बडाख, काँग्रेसचे संजय छल्लारे, अरुण नाईक, आम आदमी पक्षाचे तिलक डुंगरवाल, विकास डेंगळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे कैलास बोर्डे, लकी सेठी, श्रमिक महासंघाचे कॉ. बाळासाहेब सुरूडे, कॉ. मदिना शेख, कामगार सभेचे अविनाश आपटे, लाल निशाण पक्षाचे कॉ. जीवन सुरूडे, शरद संसारे, शिवसेनेचे सचिन बदडे, दादासाहेब कोकणे, वंचित बहुजन आघाडीचे चरण त्रिभुवन, शुभम लोळगे, जोएब जमादार, आसिफ तांबोळी, कचरू कसबे, ज्ञानदेव चक्रनारायण, अमरप्रीतसिंग सेठी, साइनाथ वारकर, जलील शाह, राजू पगारे आदींनी केले आहे.
----------