कृषिदूताकडून शेकऱ्यांना ॲप इन मार्केटिंगचे मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST2021-09-07T04:27:19+5:302021-09-07T04:27:19+5:30
कुकाणा : नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील शेतकऱ्यांना बीड येथील के. एस. के ऊर्फ काकू कृषी महाविद्यालयातील कृषिदूत आकाश ...

कृषिदूताकडून शेकऱ्यांना ॲप इन मार्केटिंगचे मार्गदर्शन
कुकाणा : नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथील शेतकऱ्यांना बीड येथील के. एस. के ऊर्फ काकू कृषी महाविद्यालयातील कृषिदूत आकाश भारत कोठुळे याने कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत ॲप इन मार्केटिंग ऑफ फार्म प्रोड्युसर याबाबत मार्गदर्शन केले.
ग्रामस्थांनी कृषिदूताचे स्वागत केले.
आधुनिक तंत्रज्ञानाचे हस्तांतर व्हावे, शेतकऱ्यांना ग्रामीण भागात विकास साधता यावा या उद्देशाने आकाश कोठुळे याने थेट कृतीतून व गट चर्चेतून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यासाठी त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. ए. शिंदे, डॉ. एस. एस. चव्हाण, डॉ. एस. पी. मोरे, प्रा. पी. बी. मांजरे, प्रा. एस. टी. शिंदे, प्रा. बी. बी. तांबोळकर, प्रा. एस. व्ही. राठोड, प्रा. बी. डी. बामणे, प्रा. एस. एस. राठोड, प्रा. बी. डी. तायडे, प्रा. डी. एस. जाधव, प्रा. बी. आर. चादर, कृषी अभियांत्रिकी विषयाचे तज्ज्ञ एस. पी. शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
---
०६जेऊर हैबती
जेऊर हैबती येथे कृषिदूत आकाश कोठुळे याने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.