शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
3
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
4
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
5
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
6
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
7
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
8
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
9
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
10
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
11
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
12
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
13
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
14
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
15
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
16
मंत्री असं कधी वागतात का? ५ मिनिटं उशीर झाला म्हणून महिला मंत्र्यांनी मागितली माफी-व्हायरल व्हिडिओ
17
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
18
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
19
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
20
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांकडून कारवाईत दुजाभाव

By admin | Updated: May 20, 2016 23:56 IST

अहमदनगर : वाहतूक पोलिसांच्या मनमानीने कळस गाठला असून, वर्गणी न देणाऱ्यांची धरपकड जोरात सुरू आहे़ त्यासाठी पोलिसांनी वाहतुकीचे नियमही धाब्यावर बसविले आहेत़

अहमदनगर : वाहतूक पोलिसांच्या मनमानीने कळस गाठला असून, वर्गणी न देणाऱ्यांची धरपकड जोरात सुरू आहे़ त्यासाठी पोलिसांनी वाहतुकीचे नियमही धाब्यावर बसविले आहेत़ काही रिक्षाचालकांवर टार्गेट करून त्यांच्यावर वारंवार कारवाई करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे़ पोलिसांच्या या मनमानीकडे वरिष्ठांनीही डोळेझाक केली आहे, हे विशेष! शहरात चार हजारांहून अधिक विनापरवाना पॅगो रिक्षा आहेत़ रितसर परवाना देण्याची त्यांची मागणी आहे, मात्र ती मिळत नाही़ परवाना मिळत नाही म्हणून रिक्षा उभी करून चालत नाही़ रिक्षा उभी ठेवली तर खायचे काय, असा प्रश्न रिक्षाचालकांसमोर आहे़ संसाराचा गाडा चालविण्यासाठी काहीजण प्रवाशी वाहतूक करतातही़ पण, दिवसभराची कमाई पोलिसांच्या हवाली करावी लागते, असा त्यांचा अनुभव आहे़ पोलिसांचे हे धोरण काही सगळ्यांसाठीच आहे, असेही नाही तर ठराविक रिक्षा चालकांसाठीच हे नियम आहेत़ इतरांना मात्र रान मोकळे आहे़ पोलीस ठाण्यातून कारवाईसाठी बाहेर पडण्याआधीच कारवाई करण्याचे नियोजन होते़ कुणावर कारवाई करायची आणि कुणाला सूट द्यायची, हे आधीच ठरलेले असते़ कारवाईच्या इराद्याने चारचाकी वाहनातून आलेले हे त्रिकूट दंडाच्या नावाखाली सर्रास वसुली करत असल्याची तक्रार आहे़ वाहन सोडविण्यासाठी चालक गेल्यास त्यांना साहेब नाहीत, नंतर या, पावती करतो, असे सांगून रिक्षा सोडविण्यास टाळाटाळ करतात़ काहीवेळा तर हजार रुपये घेऊन शंभराचीच पावती हातावर टेकविली जाते, असे रिक्षा चालकांचे म्हणणे आहे़ परवानाधारक पॅगोरिक्षा चालकांना तीन प्रवाशी वाहतूक करण्याची मुभा आहे़ मात्र, पोलिसांची बडदास्त ठेवणाऱ्यांना सर्वकाही माफ असते़ त्यांच्या रिक्षांवर कारवाई तर दूरच, पण अशा रिक्षांना पोलीस हातही करत नाहीत़ त्यांच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करतात़ असे रिक्षा चालक जोरात निघून जातात़ त्यांच्यावर कारवाई होत नाही़ इतरांना मात्र पोलिसांच्या खाकीचे दर्शन होते़ त्यामुळे सर्वसामान्य रिक्षाचालक वैतागले आहेत़ (प्रतिनिधी)