काळविटांसाठी जाळे लावणारा शिकारी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:28 IST2021-09-10T04:28:37+5:302021-09-10T04:28:37+5:30

रेहेकुरी वन परिक्षेत्रात गट नंबर १६१ ड येथे ६ सप्टेंबर रोजी काही शिकाऱ्यांनी काळविटाच्या शिकारीसाठी जाळे (वाघर) लावले होते. ...

Antelope hunter arrested | काळविटांसाठी जाळे लावणारा शिकारी ताब्यात

काळविटांसाठी जाळे लावणारा शिकारी ताब्यात

रेहेकुरी वन परिक्षेत्रात गट नंबर १६१ ड येथे ६ सप्टेंबर रोजी काही शिकाऱ्यांनी काळविटाच्या शिकारीसाठी जाळे (वाघर) लावले होते. वन कर्मचारी गस्तीवर असताना त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. कर्मचाऱ्यांना पाहून शिकारी पळून गेले. मात्र, घटनास्थळी वन विभागाने त्यांची एक दुचाकी, २ नायलाॅनचे मोठे जाळे, कोयते व इतर मुद्देमाल जप्त केला. दुचाकीच्या माहितीवरून एका आरोपीची माहिती मिळाली. त्याचे नाव ज्ञानेश्वर सुरेश काळे असून तो कुळधरण (ता. कर्जत) येथील आहे. मेळघाट सायबर सेलच्या मदतीने आरोपीचे लोकेशन सापडले. परंतु तो तेथूनही चलाखीने पळून गेला. पण कर्जत पोलिसांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यात अखेर यश मिळाले. या आरोपीच्या उर्वरित साथीदारांचीही माहिती मिळाली असून सर्व रेहेकुरी व कुळधरण परिसरातील असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपीला १४ सप्टेंबरपर्यंत वन कोठडी मिळाली आहे.

ही कारवाई पुणे वन्यजीव विभागाचे वन संरक्षक रमेश कुमार यांच्या आदेशान्वये करण्यात आली. यासाठी पुणे वन्यजीव विभागीय वन अधिकारी भुरके व सहायक वन संरक्षक वाकचौरे यांचेही मार्गदर्शन लाभले.

Web Title: Antelope hunter arrested