संतप्त तरुणांनी रस्त्यावरील खड्ड्यांत केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:21 IST2021-07-26T04:21:01+5:302021-07-26T04:21:01+5:30

शेवगाव : तालुक्यातील बोधेगाव बसथांब्याजवळ खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाल्याने मोठ्या प्रमाणात चिखल पसरला आहे. चिखलातून वाट काढताना वाटसरू ...

Angry youths planted trees in potholes on the road | संतप्त तरुणांनी रस्त्यावरील खड्ड्यांत केले वृक्षारोपण

संतप्त तरुणांनी रस्त्यावरील खड्ड्यांत केले वृक्षारोपण

शेवगाव : तालुक्यातील बोधेगाव बसथांब्याजवळ खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाल्याने मोठ्या प्रमाणात चिखल पसरला आहे. चिखलातून वाट काढताना वाटसरू तसेच वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. याचा निषेध नोंदवत सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आणण्यासाठी डॉ. क्षितिज घुले युवा मंचच्या वतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांत रविवारी सकाळी वृक्षारोपण करण्यात आले.

यावेळी घुले युवा मंचचे अनिल घोरतळे, सचिन घोरतळे, सिद्धांत घोरतळे, प्रसाद पवार, मनोज घोरतळे, तुषार जायगुडे, चेतन देशमुख, ज्ञानेश्वर घोरतळे, हारुण बागवान उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून बोधेगाव बसथांबा रस्त्याचा प्रश्न रेंगाळत पडला आहे. या रस्त्याच्या संदर्भात अनेकदा निवेदने देण्यात आली आहेत. रस्त्याचा प्रश्न गंभीर झालेला असताना अनेक अपघात होऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाकडून डोळेझाक होत आहे. या परिसरात पावसाळ्यात गुडघाभर पाणी साचून प्रत्येक मान्सूनवेळी खड्डे पडतात. हा रस्ता राज्यमार्ग असल्याने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. या मार्गावरून मोठ्या प्रमाणावर लहान-मोठ्या वाहनांची रहदारी सुरू असते.

ग्रामपंचायतीसह अनेक नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला अनेकवेळा लेखी स्वरूपात तसेच तोंडी कळविले आहे, मात्र बांधकाम विभाग दखल घेत नसल्याने परिसरातील नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. रस्त्याची मलमपट्टी न करता येत्या आठ दिवसांत चांगल्या पद्धतीने हे खड्डे न बुजविल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा घुले युवा मंचच्या वतीने देण्यात आला आहे.

------

२५ बोधेगाव रोड

बोधेगाव येथे रस्त्यावरील खड्ड्यांत वृक्षारोपण करण्यात आले.

250721\img-20210725-wa0038.jpg

शेवगाव तालुक्यातील बोधेगाव येथे रस्त्यावर पडलेल्या खड्यात वृक्षारोपण करुन डॉ. क्षितिज घुले मंचाच्या वतीने गांधीगिरी.

Web Title: Angry youths planted trees in potholes on the road