अंगणवाडी कर्मचारी सभेने केले मोबाइल परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:23 IST2021-08-26T04:23:07+5:302021-08-26T04:23:07+5:30

महाराष्ट्र शासनाने राज्यातील अंगणवाडी सेविकांना १ लाख ५ हजार ५९२ मोबाइल २०१९ मध्ये दिले. हे मोबाइल निकृष्ट दर्जाचे आहेत. ...

Anganwadi staff meeting made mobile return | अंगणवाडी कर्मचारी सभेने केले मोबाइल परत

अंगणवाडी कर्मचारी सभेने केले मोबाइल परत

महाराष्ट्र शासनाने राज्यातील अंगणवाडी सेविकांना १ लाख ५ हजार ५९२ मोबाइल २०१९ मध्ये दिले. हे मोबाइल निकृष्ट दर्जाचे आहेत. ते वारंवार बिघडतात. सेविकांना तीन ते पाच हजार दुरुस्तीसाठी खर्च करावे लागतात. या मोबाइलची क्षमता कमी आहे. त्यावर पूर्ण क्षमतेने काम करता येत नाही. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने १७ ऑगस्टपासून मोबाइलवरील कामकाज बंद आंदोलन सुरू केले आहे, तसेच मोबाइल वापसी आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारी अकोले येथे मोबाइल वापसी आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने सेविका होत्या. १४० मोबाइल एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी आरती गांगुर्डे यांनी शासनाच्यावतीने स्वीकारले. या आंदोलनाचे नेतृत्व वकील निशा शिवूरकर, जिल्हाध्यक्ष सत्यभामा तिटमे, तालुकाध्यक्ष बेबी हरनामे यांनी केले. आपल्या भाषणात शिवूरकर यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या लढाऊ एकजुटीचे स्वागत केले, तसेच सरकारने नवीन, चांगले मोबाइल द्यावेत, पोषण ट्रॅक मराठीत करावे, कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी द्यावी, या मागण्या केल्या, तसेच तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. आंदोलन यशस्वी करण्यासाठी सविता शेलार, अनिता सदगीर, निशा साबळे, सुजाता आवारी-फापाळे, चंद्रकला फापाळे, सीमा गायकर, उषा शेलार, चंद्रकला गाडे यांनी प्रयत्न केले.

Web Title: Anganwadi staff meeting made mobile return