अमृतवाहिनी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे जेईई परीक्षेत यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:21 IST2021-07-29T04:21:29+5:302021-07-29T04:21:29+5:30

अशोक सोडनर या विद्यार्थ्याने देशपातळीवर ३४६ वे मानांकन मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच देविदास लहामगे, अविनाश कोटकर, जयेश ...

Amrutvahini Pharmacy students succeed in JEE exam | अमृतवाहिनी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे जेईई परीक्षेत यश

अमृतवाहिनी फार्मसीच्या विद्यार्थ्यांचे जेईई परीक्षेत यश

अशोक सोडनर या विद्यार्थ्याने देशपातळीवर ३४६ वे मानांकन मिळवून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांक मिळवला. तसेच देविदास लहामगे, अविनाश कोटकर, जयेश पवार, उपासना घोलप, प्राजक्ता थोरात, भरत आगिवले आणि प्रणिता पगारे यांनी देखील मानांकन मिळवून संस्थेचा लौकिक राष्ट्रीय पातळीवर नेला आहे. या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी दरमहा बारा हजार चारशे रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा प्रभावी वापर करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या अमृतवाहिनी संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रणालीमुळे येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवर स्पर्धेत कायमच यशस्वी ठरत असल्याचे संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी सांगितले. संस्थेचे अध्यक्ष महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, संस्थेचे विश्वस्त आमदार डॉ. सुधीर तांबे, शरयू देशमुख, इंद्रजीत थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. चव्हाण यांनी विद्यार्थांचे कौतुक केले.

Web Title: Amrutvahini Pharmacy students succeed in JEE exam