'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 17:57 IST2025-10-05T17:54:53+5:302025-10-05T17:57:45+5:30
"हे काम केवळ शिव छत्रपतींचे अनुयायीच करू शकतात, औरंगजेबाच्या समर्थकांमध्ये ही हिंमत नाही....”

'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह रविवारी (05 ऑक्टोबर 2025) महाराष्ट्राच्या एकदिवसीय दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शिर्डीच्या साईबाबा मंदिरात दर्शन घेतले. यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील एका कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. शाह म्हणाले, “जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री होते, तेव्हा यांच्या नेतृत्वाखालील सरकारने औरंगाबादचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केले आणि अहमदनगरला पुण्यश्लोक अहिल्याबाई यांचे नावाही दिले. हे काम केवळ शिव छत्रपतींचे अनुयायीच करू शकतात, औरंगजेबाच्या समर्थकांमध्ये ही हिंमत नाही.”
विट्ठलराव विखे पाटील आणि बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्यांचे अनावरण -
यावेळी शाह यांनी प्रवरानगर येथे सहकार क्षेत्रातील अग्रणी व्यक्तिमत्त्व विट्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुतळ्यांचे अनावरण केले. ते म्हणाले, “पद्मश्री विजय पाटील यांनी आपले आयुष्य शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी वाहिले. प्रवरानगर हे देशभरात सहकार क्षेत्राच्या पटरीच्या स्वरुपात ओळखले जाते.”
शेतकऱ्यांसाठी केंद्र-राज्याची मोठी मदत - -
या वर्षी अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील 60 लाख हेक्टर्सहून अधिक शेतीचे नुकसान झाले असल्याचे सांगत शाह म्हणाले, केंद्र सरकारने 2025-26 मध्ये महाराष्ट्राला 3,132 कोटी रुपये दिले, यांपैकी 1,631 कोटी रुपये एप्रिलमध्येच देण्यात आले आहेत. याशिवाय, राज्य सरकारने शेतकऱ्यांचा त्रास कमी करण्यासाठी अनेक महत्वाची पावले उचलली असल्याचेही गृह मंत्री शाह यांनी म्हटले आहे.
अहिल्यानगर, महाराष्ट्र: केंद्रीय गृह मंत्री अमित शाह ने कहा, "एकनाथ शिंदे और अजित पवार के नेतृत्व में, महाराष्ट्र के सभी मंत्री और सांसद, पद्मश्री पाटिल और पद्म विभूषण भूषण बालासाहेब विखे पाटिल के साथ, उनके योगदान को याद करने के लिए एकत्र हुए हैं। मुझे इस क्षेत्र में आकर खुशी हो… pic.twitter.com/ycdihHarCY
— IANS Hindi (@IANSKhabar) October 5, 2025
"राज्य सरकारनेही, पूरग्रस्तांना प्रत्येकी 10,000 रुपये रोख, 35 किलो धान्य, कर्जवसुलीवर स्थगिती, ई-केवायसी नियमांत सवलत आणि कर, शालेय शुल्कात सूट देऊन मोठी मदत केली, असेही शाह यांवेळी म्हणाले. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे आणि पवार यांच्या प्रयत्नांचे कौतुकही केले.