माणिकदौंडी अंतर्गत उपकेंद्रांवरही लसीकरण सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:20 IST2021-04-25T04:20:02+5:302021-04-25T04:20:02+5:30

माणिकदौंडी : पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या शिरसाटवाडी, घुमटवाडी, जाटदेवळे, आल्हनवाडी, मोहरी या सर्व उपकेंद्रांवरही ...

Also start vaccination at sub-centers under Manikdaundi | माणिकदौंडी अंतर्गत उपकेंद्रांवरही लसीकरण सुरू करा

माणिकदौंडी अंतर्गत उपकेंद्रांवरही लसीकरण सुरू करा

माणिकदौंडी : पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या शिरसाटवाडी, घुमटवाडी, जाटदेवळे, आल्हनवाडी, मोहरी या सर्व उपकेंद्रांवरही कोरोना लसीकरण तत्काळ सुरू करावे, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे सरपंच अविनाश बबनराव पालवे यांनी केली.

माणिकदौंडी परिसरातील गावे डोंगरदऱ्यात वसलेली आहेत. या गावांना लसीकरणासाठी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात जावे लागते. सध्या लॉकडाऊन असल्याने दळणवळणाची साधने नाहीत. त्यामुळे अनेक ज्येष्ठ नागरिकांना लस घेण्याची इच्छा असूनही त्यांना केंद्रापर्यंत पोहोचता येत नाही. त्यामुळे माणिकदौंडी प्राथमिक आरोग्य केंद्र व त्याअंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमध्ये लसीकरण सुरू करावे, अशी मागणी पालवे यांनी निवेदनात केली आहे.

---

२४ माणिकदौंडी

सरपंच अविनाश पालवे यांनी पाथर्डी येथे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना निवेदन दिले. यावेळी संतोष जिरेसाळ व इतर.

Web Title: Also start vaccination at sub-centers under Manikdaundi