शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
5
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
6
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
7
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
8
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
9
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
11
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
12
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
13
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
14
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
15
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
16
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
17
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
18
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
19
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
20
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
Daily Top 2Weekly Top 5

सव्वीस गावांत कृषीचे ‘मॉडेल व्हिलेज’

By admin | Updated: June 7, 2023 10:55 IST

ज्ञानेश दुधाडे , अहमदनगर जिल्ह्यात कोरडवाहू शेती अभियानातर्गंत सन २०१३-१४ अंतर्गंत २६ गावांत कृषी विभागाकडून मॉडेल व्हिलेज तयार करण्यात येणार आहे.

ज्ञानेश दुधाडे , अहमदनगर जिल्ह्यात कोरडवाहू शेती अभियानातर्गंत सन २०१३-१४ अंतर्गंत २६ गावांत कृषी विभागाकडून मॉडेल व्हिलेज तयार करण्यात येणार आहे. या गावांसाठी पुढील तीन वर्षासाठी प्रत्येकी ३ कोटींप्रमाणे ७८ कोटींचा निधी देण्यात येणार आहेत. यातून सिंचनासह कृषीच्या यांत्रिकीकरणावर भर देण्यात येणार आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या संकल्पनेतून कोरडवाहू शेती अभियान अस्तित्वात आलेले आहे. ७५ टक्के जिरायत शेती असणार्‍या, ७५ टक्के पाणलोटांची कामे पूर्ण केलेली गावे, शेतकर्‍यांची मागणी असणार्‍या गावांची निवड शासन पातळीवर करण्यात आलेली आहेत. या गावात कोरडवाहू शेतीला स्थैर्य प्रदान करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना तयार करण्यात येणार आहेत. कृषी मालाची उत्पादकता वाढवून प्रति क्विंटल उत्पादन खर्च कमी करणे, यांत्रिकीकरणाव्दारे उत्पादन खर्च कमी करणे, सूक्ष्मसिंचनाचा वापर करून सिंचनाची क्षमता वाढविणे, शेत मालास योग्य भाव मिळण्यासाठी निर्यातक्षम माल तयार करणे, प्रतवारी, पॅकेजिंग, वाहतूक, साठवण आदी सुविधा उभारून शेतकरीभिमुख कृषी पणन धोरण राबविण्यात येणार आहे. योजनेत निवड झालेल्या गावात मृदसंधारण, जलसंधारण, यांत्रिकीकरण, सूक्ष्मसिंचन, ठिबक, तुषार, साखळी बंधारे, शेततळी, शेततळ्यांचे अस्तरीकरण, शेतकर्‍यांना प्रशिक्षण, वैयक्तिक लाभाच्या योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. वैयक्तिक लाभाच्या योजना राबविताना अल्प भूधारक, महिला शेतकरी, अनुसूचित जाती, जमातीच्या शेतकर्‍यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. ्रपहिल्या टप्प्यात चौदा गावे योजनेसाठी पहिल्या टप्प्यात १४ गावांची निवड करण्यात आली आहे. यात रायतळे (पारनेर), तांदळी वडगाव (नगर), चिखली (श्रीगोंदा), सातवड (पाथर्डी), बावी (जामखेड), लोहगाव (नेवासा), थाटे (शेवगाव), कणगर बु (राहुरी), उक्कडगाव (कोपरगाव), भामाठाण (श्रीरामपूर), अस्तगाव (राहाता), शेडगाव (संगमनेर) आणि वाशेरे (अकोले) यांचा समावेश आहे. दुसर्‍या टप्प्यात खासबाब म्हणून आणखी १२ गावांची निवड करण्यात आली आहे. यात वांबोरी आणि कात्रड (राहुरी), चिंचपूर, शिबलापूर, खळी आणि पिंप्री लौकी (संगमनेर), केलवड, गोगलगाव, डोºहाळे, पिंपरी निर्मळ, चितळी, धनगरवाडी (राहाता) यांचा समावेश आहे. योजनेत ट्रॅक्टर योजनेसाठी शेतकर्‍याला २ लाख रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. यात ९० हजार रुपये ट्रॅक्टरसाठी तर उर्वरित अवजारांसाठी आहे. शेतकरी बचत गटाला हे अनुदान ४ लाख रुपयांपर्यंत मिळणार आहे. उर्वरित साहित्याला ५० टक्के अनुदान राहणार आहे.