पारनेर सैनिक बँकेवर प्रशासक नेमावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:27 IST2021-09-07T04:27:13+5:302021-09-07T04:27:13+5:30

या संदर्भात जिल्हा उपनिबंधक आहेर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संचालक मंडळाच्या गैरव्यवहाराच्या व अनियमिततेच्या अनेक तक्रारी सहकार विभागाकडे ...

An administrator should be appointed at Parner Sainik Bank | पारनेर सैनिक बँकेवर प्रशासक नेमावा

पारनेर सैनिक बँकेवर प्रशासक नेमावा

या संदर्भात जिल्हा उपनिबंधक आहेर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, संचालक मंडळाच्या गैरव्यवहाराच्या व अनियमिततेच्या अनेक तक्रारी सहकार विभागाकडे करण्यात आल्या आहेत. यातील काही प्रकरणाची चौकशी सुरू आहे. काही प्रकरणांमध्ये चौकशी अधिकाऱ्यांनी संचालक मंडळाच्या गैरकारभारावर ताशेरे ओढले आहेत. गैरव्यवहारांची चौकशी सुरू असताना मुदत संपलेले संचालक मंडळ सत्तेत राहणे उचित नाही. मुदतवाढ मिळालेल्या संचालकांकडून आणखी गैरव्यवहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार सभासदांच्या आणि बँकेच्या आर्थिक हितासाठी घातक आहे. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात यावी व बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक वेळेत घ्यावी, अशी ही मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

...........

०६ निवेदन नरसाळे

जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांना निवेदन देताना बाळासाहेब नरसाळे, मारुती पोटघन आदी.

Web Title: An administrator should be appointed at Parner Sainik Bank