शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

मुंगीत वाळू तस्करांची दीड कोटीची मालमत्ता जप्त

By admin | Updated: January 17, 2016 23:41 IST

शेवगाव : शेवगाव तहसील कार्यालयातील वाळू प्रतिबंधक पथकाने पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीच्या पात्रात वाळू तस्करांविरुद्ध केलेल्या धडक कारवाई

शेवगाव : शेवगाव तहसील कार्यालयातील वाळू प्रतिबंधक पथकाने पोलिसांच्या मदतीने तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदीच्या पात्रात वाळू तस्करांविरुद्ध केलेल्या धडक कारवाईत सुमारे १ कोटी ३८ लाख ७० हजार रुपये किमतीचे एक पोकलेन मशीन, ३ हायवा ट्रक, २ डंपर व १ ट्रक, अशी ६ वाहने, २९ ब्रास वाळूसह ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस ठाण्यातून सांगण्यात आली.पथकप्रमुख मंडळाधिकारी अप्पासाहेब गंगाधर शिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून कुख्यात वाळू तस्कर युनुस शेख व त्याच्या सहकाऱ्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेवगावचे तहसीलदार दादासाहेब गिते यांनी तहसील कार्यालयातील वाळू प्रतिबंधक पथक व पोलिसांसह शनिवारी पहाटे तालुक्यातील मुंगी येथील गोदावरी नदी पात्रात छापा घातला. यावेळी वरील वाहने वाळूसह ताब्यात घेण्यात आली. यावेळी दोन ट्रक पळून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या परिसरातील वाळूचा कायदेशीर लिलाव झालेला नसताना वाळू माफिया युनुस शेख व इतरांनी गेल्या काही दिवसात २२ लाख ९५ हजार रुपये किमतीची ४२५ ब्रास वाळूची उचलेगिरी केल्याचीही पोलिसात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत वरील सर्वांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणला तसेच शासकीय महसुलाची हानी केली, याबाबत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली बोधेगाव दूरक्षेत्राचे हे. कॉ. तुकाराम काळे हे अधिक तपास करीत आहे. (तालुका प्रतिनिधी)