उत्तम कामाची ती पावती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:25 IST2021-08-19T04:25:41+5:302021-08-19T04:25:41+5:30

तहसीलदार कांबळे यांची धुळे येथे उपजिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाली. त्यांचा सदिच्छा समारंभ महसूल विभागाच्यावतीने पंचायत समितीच्या सभागृहात ...

That acknowledgment of great work | उत्तम कामाची ती पावती

उत्तम कामाची ती पावती

तहसीलदार कांबळे यांची धुळे येथे उपजिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाली. त्यांचा सदिच्छा समारंभ महसूल विभागाच्यावतीने पंचायत समितीच्या सभागृहात पार पडला. यावेळी अध्यक्षस्थानाहून डॉ. मंगरुळे बोलत होते.

यावेळी सपोनि मिथुन घुगे, प्रभारी तहसीलदार ठकाजी महाले, नायब तहसीलदार दत्ता जाधव व पाचारणे, शेतकरी नेते डॉ. अजित नवले, सुरेश खांडगे, बाळासाहेब भोर, महेश नवले, दीपक महाराज देशमुख, सुरेश गडाख, अभियंता ज्ञानेश बागुल, विद्याचंद्र सातपुते, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हेमंत आवारी, अल्ताप शेख, सचिन आवारी, सुरिंदर वावळे उपस्थित होते.

डॉ.मंगरुळे म्हणाले, ज्या गावात शिक्षण घेतले, जिथे मोठे झालो तेथे शक्यतो काम करण्याची संधी अधिकाऱ्याला मिळत नाही; मात्र कांबळे यांना अकोले येथे हे भाग्य लाभले. पद ही संस्था आहे व त्यांनी या पदाला न्याय दिला. शासनाचे उद्दिष्टे त्यांनी पूर्ण केले. तालुक्यात कोरोना रुग्ण संख्या कमी राहिली. आता त्यांना जिल्हा पातळीवर काम करण्याची संधी मिळाली, तेथेही ते आपल्या कामाचा ठसा उमटवतील. डॉ.अजित नवले, भाऊसाहेब चासकर, महेश नवले, बाळासाहेब भोर, दीपक महाराज, अमोल वैद्य, ज्ञानेश बागुल, डॉ. श्यामकांत शेटे, मिथुन घुगे यांची मनोगते झाली. स्वागत व प्रास्ताविक मंडलाधिकारी बाबासाहेब दातखिळे यांनी केले. सूत्रसंचालन तलाठी प्रवीण ढोले यांनी केले. आभार राकेश रावते यांनी मानले.

Web Title: That acknowledgment of great work