शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
2
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
3
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
5
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
6
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
7
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
8
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
9
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
10
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
11
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
12
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
13
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
14
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
15
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
16
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
17
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
18
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
19
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
20
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

‘आधार कार्ड’ वयाचा पुरावा नाही

By admin | Updated: January 31, 2016 23:31 IST

अहमदनगर : विविध गुन्ह्यांमध्ये सध्या तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसतो आहे.

अहमदनगर : विविध गुन्ह्यांमध्ये सध्या तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणात दिसतो आहे. तरुणांना अटक झाल्यानंतर त्यांना वाचविण्यासाठी ते अल्पवयीन असल्याचे सिद्ध करण्यासाठी आरोपींचे वकील धडपड करतात. वय सिद्ध करण्यासाठी आधार कार्ड कुचकामी ठरले असून शाळेचा दाखला हाच एकमेव पुरावा न्यायालयात ग्राह्य धरण्यात येत आहे. याचा अनुभव नुकताच एका प्रकरणात वकिलांना आणि पोलिसांनाही आला.शहरातील तेलीखुंट येथे गेल्या रविवारी दगडफेक झाली होती. या घटनेप्रकरणी तोफखाना पोलिसांनी पाच जणांना अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपींच्या वकिलांनी तीन जण अल्पवयीन असल्याने त्यांना सोडून देण्यात यावे, असा युक्तीवाद केला होता. मात्र, न्यायालयाने त्यांच्या वयाचा पुरावा सादर करण्याचे वकिलांना सांगितले. त्यावेळी वकिलांनी तिन्ही संशयितांचे आधारकार्ड न्यायालयापुढे सादर केले. मात्र वयाचा पुरावा म्हणून आधारकार्ड देऊ नका, असे मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी वकिलांना ठणकावले. वयाचा पुरावा म्हणून शाळेचा दाखला सादर करा, असे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे ऐनवेळी संशयितांचे नातेवाईक आणि वकिलांची एकच तारांबळ उडाली. शाळेचा दाखला मिळविण्यासाठी नातेवाईकांची एकच धावपळ झाली. संशयितांना कोठडीत ठेवायचे की कारागृहात याचा निर्णय अधांतरी राहिला. त्यामुळे पोलिसांनाही आरोपींना नेमके ठेवायचे कुठे? असा प्रश्न पडला होता. दरम्यान संशयितांच्या नातेवाईकांनी शाळेमधून तातडीने सायंकाळी सहा वाजता दाखले उपलब्ध करुन ते न्यायालयात सादर केले. याच पुराव्यामुळे तिन्ही संशयितांचे वय १८ वर्षांच्या आत असल्याचे स्पष्ट झाले आणि त्यांना जामीन झाला. आधार कार्ड ही सक्ती नाही, असा निर्वाळा यापुर्वीच सवौच्च न्यायालयाने दिला होता. तरीही स्थानिक पातळीवर त्याची गंभीर दखल न घेतल्याने ही तारांबळ उडाली.(प्रतिनिधी)