शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

६४ जवान सैन्यात दाखल

By admin | Updated: August 4, 2014 00:43 IST

अहमदनगर : एमआयआरसी येथे झालेल्या शानदार दीक्षांत संचलनात ६४ जवान देशसेवेची शपथ घेत सैन्यदलात दाखल झाले. हे जवान आता देशाच्या विविध भागात पुढील प्रशिक्षणासाठी रवाना होतील.

अहमदनगर : एमआयआरसी येथे झालेल्या शानदार दीक्षांत संचलनात ६४ जवान देशसेवेची शपथ घेत सैन्यदलात दाखल झाले. हे जवान आता देशाच्या विविध भागात पुढील प्रशिक्षणासाठी रवाना होतील. येथील मेकॅनाईज्ड इन्फन्ट्री रेजिमेंटल सेंटर (एमआयआरसी) मधील आखोरा ड्रील कवायत मैदानावर सकाळच्या प्रसन्न वातावरणात या जवानांनी शानदार संचलन करून उपस्थितांची मने जिंकली. एमआयआरसीच्या आयटी बटालियनचे मुख्य अधिकारी कर्नल एम.एस. सचदेव यांनी संचलनाची मुख्य सलामी स्वीकारली. त्यानंतर त्यांनी उघड्या जीपमधून जवानांच्या संचलनाचे निरीक्षण केले. त्यानंतर परेड अ‍ॅडज्युटंट मेजर अनिल कुमार यांनी संचलनाच्या सूचना दिल्या. राष्ट्रगीताची धून सुरू असताना मैदानातून राष्ट्रध्वज व एमआयआरसीच्या निशानाचे संचलन करण्यात आले. उपस्थितांसह सर्व अधिकारी, जवानांनी उभे राहून ध्वजाला सलामी दिली. त्यानंतर आपापल्या धर्मगुरूंकडून जवानांनी धर्मग्रंथावर हात ठेवून देशसेवेची शपथ घेतली. दरम्यान, सचदेव यांनी जवानांच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा देत, जवानांनी परकीय, तसेच देशांतर्गत आक्रमणापासून देशवासीयांचे रक्षण करण्यासाठी सदैव तयार राहण्याचे आवाहन केले. देशसेवा करण्याची संधी मिळणे हे तुमचे भाग्य असून, जीवाची बाजी लावून तुम्ही त्याचे पालन करा, असा सल्लाही त्यांनी भावी जवानांना दिला. (प्रतिनिधी)३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करताना उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जवान जसिमुद्दीन एस. के. याला जनरल सुंदरजी सुवर्णपदक, मोहितकुमार याला रौप्य आणि भुपेंद्रसिंह याला कांस्यपदक प्रदान करण्यात आले.