नगरमधील ३७ हजार नागरिकांनी घेतली लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:20 IST2021-04-16T04:20:42+5:302021-04-16T04:20:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर: कोरोनावरील लसीकरणाला सुरुवातीला थंडा प्रतिसाद होता. मात्र रुग्ण संख्या वाढल्याने नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली ...

37,000 citizens in the city were vaccinated | नगरमधील ३७ हजार नागरिकांनी घेतली लस

नगरमधील ३७ हजार नागरिकांनी घेतली लस

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर: कोरोनावरील लसीकरणाला सुरुवातीला थंडा प्रतिसाद होता. मात्र रुग्ण संख्या वाढल्याने नागरिकांनी लस घेण्यासाठी गर्दी केली असून, नगरमधील ३७ हजार नागरिकांनी लस टोचून घेतली आहे.

महापालिकेने कोरोनावरील लसीकरणाची मोहीम हाती घेतली आहे. कोरोनाची साखळी तोडण्याबरोबरच मनपाचे कर्मचारी लसीकरणाचेही काम करत आहेत. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आला आहे. सुरुवातीला ही लस घेण्याबाबत भीती होती. कोरोनाची दुसरी लाट येऊन धडकली असून, शहरात गुरुवारी ६७५ नवे रुग्ण आढळून आले आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्याने खबरदारी म्हणून नागरिक लस घेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्व लसीकरण केंद्रांवर लस घेण्यासाठी गर्दी होताना दिसते आहे. ही गर्दी कमालीची वाढल्याने महापौर बाबासाहेब वाकळे व आयुक्त शंकर गोरे यांनी लसीकरण केंद्राला भेट दिली होती. पाहणी दरम्यान केंद्रावर गर्दी झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यांनी गर्दी कमी करण्याच्या सूचना केल्या. परंतु तरीदेखील दुसऱ्या दिवशी गुरुवारीही सावेडी येथील लसीकरण केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.

.....

नागरिकांची मनपाच्या लसीकरण केंद्राला पसंती

शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्याकडे रुग्णांचा कल असतो. कोरोनाबाधित रुग्ण खाजगी रुग्णालयांनाच पसंती देत आहेत. परंतु, कोराेनावरील लस घेताना नागरिक महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांनाच पसंती देत असल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

....

कुठे किती लसीकरण

खाजगी रुग्णालये

- ४५ वर्षावरील २,३९०

६० वर्षावरील- ३,७४०

.....

मनपाचे लसीकरण केंद्र

४५ वर्षावरील-६,३९७

६० वर्षावरील- ९,३५२

......

आरोग्य सेवक- ६,९५७

फ्रंटलाईन वर्कर- ३,२२८

...

एकूण केंद्र -१८

मनपा- ९, खाजगी-९

Web Title: 37,000 citizens in the city were vaccinated